Goa Forward Dainik gomantak
गोवा

आणखी तीन जागांवर गोवा फॉरवर्डचे लक्ष

काँग्रेस जीएफपीच्या मागण्या मान्य करणार का?

दैनिक गोमन्तक

गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) ला मायेम आणि फातोर्डा या दोन जागा मिळाल्याने काँग्रेससोबतच्या निवडणूकपूर्व युतीचा भाग म्हणून, काणकोण, मांद्रे आणि सेंट ॲन्ड्र्यू - 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत लढणार आहेत.

रविवारी, मांद्रेममधील GFP चे संभाव्य उमेदवार, दीपक कलंगुटकर यांनी, ज्येष्ठ नागरिक आणि माजी सरपंच गणपत कलंगुटकर यांच्या उपस्थितीत मांद्रेम येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले.

पत्रकारांशी बोलताना दीपक कलंगुटकर म्हणाले, "गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक तरुण उत्साही आहेत. आम्ही मांद्रेममधील सर्व 48 बूथवर काम करत आहोत. आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे आणि त्यामुळे आम्हाला ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे."

भाजप सरकारवर (BJP Government) टीका करताना कलंगुटकर म्हणाले, "मांद्रेमधले प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली आहे. मंत्री आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष बदलत आहेत. या नव्या राजकीय (Political) संस्कृतीचा मतदारसंघ (Constituency) आणि राज्याच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे."

दरम्यान. गोवा फॉरवर्ड चे जगदीश भोबे यांनी सेंट ॲन्ड्र्यू. मांद्रे, तर गोवा फॉरवर्ड मयेमचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांनीही निवडणूक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस (Congress) जीएफपीच्या मागण्या मान्य करणार का आणि मित्रपक्षांना आणखी तीन जागा देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT