मायकल लोबोंच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध

लोबोंना काँग्रेसमध्ये घेताना वरिष्ठ नेत्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कळंगुटचे भाजप आमदार आणि मंत्री मायकल लोबोंनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लोबो भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. मात्र आता कळंगुट काँग्रेस कमिटीने मायकल लोबोंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

Michael Lobo
मयेचे आमदार प्रवीण झांट्येंचा राजीनामा; MGP मध्ये होणार सामील

मायकल लोबोंना काँग्रेसमध्ये (Congress) घेण्याच्या निर्णयात स्थानिक काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा यांनी लोबोंच्या काँग्रेस प्रवेशाला कडकडून विरोध केला आहे. कळंगुटमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अंजिलिओ फर्नांडिस यांनीही लोबोंना विरोध दर्शवला आहे.

Michael Lobo
काँग्रेसकडून गोवा फॉरवर्ड पक्षाला दोनच जागा

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) तोंडावर काँग्रेसमध्ये बंडाळी होते का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मायकल लोबोंचा (Michael Lobo) काँग्रेस प्रवेश वादात सापडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com