Goa Forward protest Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात वीज बिले जाळली! दरवाढीविरोधात गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; सरकारला दिला इशारा

Goa Forward: मडगाव नगरपालिका इमारतीसमोर गोवा फॉरवर्ड तर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिले जाळत आक्रमक आंदोलन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सरकार एकीकडे जीएसटी कमी झाल्याचा उत्सव साजरा करते, तर दुसरीकडे गोमंतकीयांच्या माथ्यावर वीज दरवाढीचे ओझे लादते. गरीबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या या सरकारने तात्काळ ४ टक्के वीज दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा भाजपला २०२७ मध्ये जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.

मडगाव नगरपालिका इमारतीसमोर गोवा फॉरवर्ड तर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिले जाळत आक्रमक आंदोलन केले. अशाच प्रकारचे आंदोलन राज्यभर सर्व मतदारसंघांत उभारण्यात येईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

राज्यात वीज खात्याचा तब्बल ३५० कोटी रुपयांचा महसूल बाकी आहे, त्यातील १४५ कोटी रुपये सरकारी खात्याकडूनच थकलेले आहेत. “प्रथम ती वसुली करा, नंतर जनतेवर ओझे टाका,” अशी सरदेसाईंची सरकारला टोला देणारी मागणी होती.

गोव्यातून मोठ्या प्रमाणावर कोळसा वाहतूक व वापर होत असून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा गोमंतकीयांना मिळायलाच हवा. सरकारने दरवाढीऐवजी स्थानिकांना सवलत द्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत असल्याने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सरदेसाई म्हणाले. तथापि, प्रत्येक पक्ष सर्व मतदारसंघांत उमेदवार देण्याच्या गोंधळामुळे जनता संभ्रमित होत असल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी आम आदमी पक्षावर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: फातोर्ड्यात 'दामू-विजय' यांची रंगपंचमी! गळाभेट घेत दिला आश्चर्याचा धक्का; व्हिडीओ तुफान व्हायरल

Womens ODI Cricket: 7 बाद 137 वरून फटकावल्या 282 धावा! हैदराबादची झुंझार फलंदाजी; गोव्याच्या पोरींचा पराभव

Ind Vs Eng: 'भारतीय प्रेक्षकांना शांत करू'! सॅम करनने ओकली आग; वानखेडे मैदान माहिती असल्याने जिंकण्याची अपेक्षा केली व्यक्त

Panaji Election: पणजीच्या समस्या सोडवण्यात महापौर, आमदार अकार्यक्षम! पर्रीकरांचे टीकास्त्र; आवश्‍यक कामे न झाल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; उत्‍पलमुळे बाबूश गोटात खळबळ

SCROLL FOR NEXT