Goa Forward takes strong stand for Goa Teacher  Dainik Gomantak
गोवा

शिक्षकांच्या मागण्यांसाठी गोवा फॅारवर्डची न्यायालयात धाव

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंचे आश्वासन...

दैनिक गोमन्तक

पणजी: कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या 54 विशेष शिक्षकांना (Goa Teacher) नियमित केले नाही, तर त्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी आपला पक्ष मदत करेल ,असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी म्हटले आहे. तसेच या शिक्षकांना नियमित न करता भाजप सरकार नवीन पदे कसे भरणार, असा सवालही त्यांनी केला आहे.

विजय सरदेसाई यांच्यासह कार्याध्यक्ष किरण कांदोळकर आणि संघटक दुर्गादास कामत यांनी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या या शिक्षकांची भेट घेतली आणि न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. गोव्यातील या तरुणांवर अन्याय होऊ नये म्हणून गोवा फॉरवर्ड पक्षाने शुक्रवारी मुख्य सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून या शिक्षकांची मागणी लावून धरली आणि ती पूर्ण करावी असे म्हटले.

या शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सरदेसाई यांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करून त्यांची (शिक्षकांची) भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिले आहे, की ते तुम्हाला येऊन भेटतील, जर ते तुम्हाला न्याय देण्यात अपयशी ठरले, तर आम्ही तुम्हाला न्यायालयात याचिका दाखल करण्यास मदत करू, असे सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई म्हणाले, त्यांचा न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास आहे. भाजप सरकारच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक वेळा आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे आणि गोमंतकियांना न्याय मिळवून दिला आहे, असे ते म्हणाले.

शिक्षक समुदाय सर्वाधिक असुरक्षित झाला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी व इतर कामांसाठी शासन या समाजाचा गैरवापर करत आहे. कोविड लॉकडाऊनच्या दरम्यान हे लोकांनी पाहिले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

या 54 पात्र तरुणांना व्यावसायिक विषय शिकवण्यासाठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत 16125 च्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीने ते माध्यमिक शाळेत सेवा देत आहेत. बहुतेक शिक्षकांनी 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे आणि त्यापैकी काहींनी वयाची 50 वर्षेही ओलांडली आहेत.

एकीकडे भाजप सरकार 10 हजार नोकऱ्यांचे आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्यांवर अन्याय करत आहे. शिक्षकांना त्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT