ममतांकडून 'तिसऱ्या आघाडीसाठी' गोव्यात चाचपणी सुरू...

अन्य पक्षांशी युती करण्याची आमची तयारी; ममता बॅनर्जी
Goa Election : Mamata Banerjee
Goa Election : Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : पाणी नाकातोंडाकडे पोहोचले तरी समविचारी पक्षांशी युती करण्याबाबत काँग्रेसने मौन बाळगले असताना आता गोव्यात (Goa) भाजप (BJP) व काँग्रेस (congress) या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून अन्य पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी करता येणे शक्य आहे का, याची सध्या चाचपणी सुरू झाली आहे. यात तृणमूल (Trinamool) काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावण्याची (Goa Election) शक्यता व्यक्त केली जात आहे.

Goa Election : Mamata Banerjee
पावसाने विश्रंती घेतल्याने, भातपीक शेतकऱ्यांना दिलासा

दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेल्या तृणमूल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह त्यांचे आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी बोलणी केली. काल त्यांनी मगोचे सुदिन ढवळीकर, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव आणि अपक्ष आमदार रोहन खवटे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गोव्यात कुणाशीही युती करणार नाही, पाहिजे तर त्या पक्षांनी आमच्यात विलीन व्हावे, अशी तृणमूलने ताठर भूमिका घेतली होती ती शिथिल करून ममता बॅनर्जी यांनी अन्य पक्षांशी युती करण्याची आमची तयारी आहे, असे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनीही या सर्व गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पाहणे सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Goa Election : Mamata Banerjee
इफ्‍फीचा पडदा आता 'ओटीटी'साठीही ओपन

सरदेसाई म्हणतात...

आजच्या भेटीबद्दल विजय सरदेसाई यांना विचारले असता, प्रादेशिक पक्षांना विलीन होण्यास सांगणे हे अतिघाईचे होईल, हे मी ममता बॅनर्जींना पटवून दिले. सर्वांनी एकत्र येऊनही भाजपला बाहेर ठेवता येते, असे मी त्यांना सांगितले आहे.

प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे : ममता

भाजपला हरविण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज व्यक्त मांडले. दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की जातीयवादी, धर्माधिष्ठित भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एकत्रित येणे आवश्‍यक आहे. आगामी काळात प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘अच्छे दिन’चे आश्वासनही त्याच पद्धतीने हवेत विरले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com