Goa Forward Party Youth Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party Youth: गोवा फॉरवर्ड पक्षात 30 हून अधिक युवकांचा प्रवेश; 'जेन झी'ने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दाखवून दिली-विजय सरदेसाई

Goa Youth Politics: सरदेसाई म्हणाले की, पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्यांसह पुढे जायचे असून, गोमंतकीयांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा सुरू राहील

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: गोव्यातील युवकांना संघटित करून गोमंतकीयांना न्याय मिळवून देण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष कटिबद्ध असल्याचे फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले. ‘जेन झी’ने अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याची ताकद दाखवून दिली असून, इतर राजकीय पक्षांनीही त्यातून धडा घ्यावा, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील वेळ्ळी येथील युवक नागेश साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली कुडतरी, मडगाव, कुंकळ्ळी, नावेली आणि कुडचडे परिसरातील ३० हून अधिक युवकांनी शनिवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. यावेळी विजय सरदेसाई यांनी सर्वांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले की, पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्यांसह पुढे जायचे असून, गोमंतकीयांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा सुरू राहील.नागेश साळगावकर म्हणाले की, गोव्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आम्ही गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे.

आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून, गोव्याला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यात शिक्षण, रोजगार आणि विकास या क्षेत्रांत मोठ्या बदलाची गरज असून, हा बदल घडवून आणण्याची क्षमता गोवा फॉरवर्ड पक्षात असल्याचा दावाही साळगावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT