Vikas Bhagat  Gomantak Digital Team
गोवा

Goa Forward Party : पर्यटन व्यवसायही परप्रांतीयांकडे?

गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल ः शॅक खंडणीप्रकरणी सरकार चिडिचूप

गोमन्तक डिजिटल टीम

खाण व पर्यटन व्यवसाय हा राज्याचा आर्थिक कणा आहे. या दोन्ही व्यवसायातून सरकारला महसूल मोठ्या प्रमाणात मिळत होता. हे दोन्ही व्यवसाय गोमंतकियांकडे आहेत. खाण व्यवसाय बंद आहे. पर्यटन व्यवसाय परप्रांतीयांकडे देण्याचे षडयंत्र सरकारकडून सुरू झाले आहेत. गोमंतकियांची सतावणूक करण्यासाठीच हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती देण्यासाठी राज्यात संघटित रॅकेट काम करत आहे.

सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे गोमंतकिय व्यवसायांवर हे संकट आले आहे. शॅक्स चालकांकडून खंडणी मागितली जात असल्याचे आरोप केले जात असतानाही हे सरकार गप्प राहून बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कोठे तरी पाणी मुरत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे. पणजीतील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे नेते विकास भगत म्हणाले, गोमंतकियांच्या हिताविरोधात सरकारने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

त्याविरुद्ध येत्या आगामी विधानसभेत पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई हे आवाज उठवून सरकारला जाब विचारण्याची तयारी केली आहे. नवे शॅक धोरण आणून त्याखाली शॅक मॉडेलचा मुद्दा समोर आला होता. त्याला शॅक चालकांनी जोरदार विरोध केला. सुमारे १ कोटीचे शॅक या मॉडेलखाली उभारण्यासंदर्भात या धोरणात उल्लेख करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आवाज उठविल्यावर ते कोठे तरी बारगळले आहे.

हल्लीच भाजपने आयात केलेले आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट परिसरातील शॅक चालकांकडे गिरी येथील काळा कोट घातलेली व्यक्ती खंडणीची मागणी केली जात असल्याचा आरोप केला होता. याविरुद्ध सरकारने सध्या कोणतेही वक्तव्य केले नाही, चौकशीही सुरू केलेली नाही. शॅक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘कन्सेट टू ऑपरेट’ परवाना नसल्याने सुमारे १२६ शॅक्स सीलबंद करण्यात आली. या शॅक चालकांनी त्यांचे सामान नेण्यासाठी तो खोलण्यात यावीत यासाठी अर्ज करूनही त्यावर निर्णय घेतला जात नाही.

विधानसभेत जाब विचारणार!

पर्यटन खात्यातर्फे ॲप उपलब्ध केला जाईल, जेणेकरून व्यावसायिकांना त्यांच्या तक्रारी दाखल करणे सोपे होणार होते, मात्र या ॲपचा पत्ताच नाही. मोपा येथील विमानतळावर मद्य परप्रांतीयाच्या दुकानाला परवाना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा परवाना परप्रांतीयाला देऊन स्थानिकांवर तो अन्याय होईल. याबाबत सरदेसाई विधानसभेत सरकारला जाब विचारतील, असेही भगत म्हणाले.

खंडणी मागणारी व्यक्ती कोण?

गोवा खंडपीठाने सीलबंद केलेल्या शॅक चालकांना उभारण्यात आलेले शॅक मोडण्यास परवानगी देण्याचे निर्देश देऊनही जाणूनबुजून त्याला विलंब होत आहे. राज्यात गोमंतकियांच्या हाती असलेले व्यवसाय हे सरकार परप्रांतीयांच्या हाती देण्याचा प्रयत्न करत आहे. काळे सूट घालून खंडणी मागणारी व्यक्ती कोण? याची चौकशी सरकारने करावी, गुन्हेगारावर कडक करवाई, अशी मागणी भगत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT