Goa Forward President Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांना अल्पसंख्याक बनवण्याचे कटकारस्थान

भूमिपुत्र विधेयकाविरोधात लढा देण्याचा गोवा फॉरवर्डचा (Goa Forward Party) निर्धार

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक (Goa) २०२१ च्या ‘भूमिपुत्र’ऐवजी ‘भूमी’ (Bhumiputra Bill) असा बदल केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांना त्यात दुरुस्ती करावी लागले. त्यासाठी हे विधेयक पुन्हा विधानसभेत मांडण्याची गरज आहे. हे विधेयक आणून मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना अप्रत्यक्षपणे मालकी हक्क देत गोमंतकीयांना अल्पसंख्याक करण्याचे कटकारस्थान रचले आहे.

त्यांनी गोमंतकीयांविरुद्ध युद्ध पुकारले असून गोमंतकीयांची अस्मिता टिकवण्यासाठी गोवा फॉरवर्ड सर्व स्तरावर लढा देईल, असा इशारा आज (बुधवारी) गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला. (Vijai Sardesai)

पणजीतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हे विधेयक सरकारने विधानसभेत मंजूर केल्याने सभागृहाची ती मालमत्ता झाली आहे. त्यामुळे त्यात बदल करायचा असल्यास ते पुन्हा सभागृहात आणावे लागेल. तसेच ते चिकित्सा समितीकडे पाठवण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेले स्पष्टीकरण विधेयक चुकीचे आहे, हे सिद्ध करते, तसेच राज्यपालांना या विधेयकाला मान्यता न देण्यास पुरेसे आहे.

या विधेयकामुळे परप्रांतीय भूमिपुत्र होतील व गोमंतकीयांना या सरकारला अल्पसंख्याक करायचे आहे. (Goa) गोमंतकीयांना भूमिपुत्रापासून (Bhumiputra Bill) अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. येत्या निवडणुकीत भाजपने केलेल्या विविध कारनाम्यांमुळे गोमंतकीय जनता त्यांना मते देणार नाही याची सरकारला खात्री झाल्यानेच हे विधेयक आणून परप्रांतियांना हक्क देण्याचा व गोमंतकीयांना कमकुवत करण्याचा डाव आहे. हे सरकार गोमंतकीयांनाच त्यांच्या भूमीवर आव्हान देत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. (Vijay Sardesai)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT