Goa Sports: केपे शासकीय महाविद्यालयाचे क्रिडा क्षेत्रातील योगदान अतुलनीय

कार्यशाळा, शिबिरे आयोजित करून त्यात विध्यार्थ्यांचा सहभाग वाढवल्याने प्रगती झाली (Goa Sports)
Quepem Collage Football Team, (Goa Sports)
Quepem Collage Football Team, (Goa Sports)Manguesh Borkar / Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे (Quepem) येथील शासकीय महाविद्यालयाने (Govt School Quepem) गत साली स्थापनेची 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीस वर्षांत त्यांचे शारिरीक शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रमुख डॉ, राजन मॅथ्यू यांच्या मार्गदर्शना खाली या महाविद्यालयाने क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली. गोवा विद्यापीठ आयोजित स्पर्धेत भाग घेण्याइतपत मर्यादीत न राहता महाविद्यालयाच्या  क्रिडा विभागाने अन्य अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. शिवाय क्रिडा संबंंधीत कार्यशाळा, शिबिरे यांत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची मुभा दिली व स्वतः अनेक कार्यशाळा व शिबिरे आयोजित केली. त्यामुळे या महाविद्यालयाची क्रिडा प्रगती होत गेली व क्रिडा संस्कृती वाढीस लागली. (Goa Sports)

Quepem Collage Football Team, (Goa Sports)
भारताकडे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची भूक कमी, चीनचा दावा

या महाविद्यालयातील प्राचार्य तसेच व्यवस्थापन समिती व इतर शिक्षकांच्या सहकार्यामुळेच क्रिडा क्षेत्रातील प्रगती शक्य असल्याचे डॉ. मॅथ्यू यांनीू सांगितल्या. शिवाय महाविद्यालयात उपलब्ध असलेले स्वतःचे मैदान व इतर सुविधांमुळे पुष्कळ फायदा होत असल्याचेही डॉ. मॅथ्यू यानी सांगितले. केपे सारख्या ग्रामीण भागात हे महाविद्यालय असल्यामुळे तळागळातील जे युवा खेळाडू तयार होतात व जे या महाविद्यालयात शिकतात त्यामुळे त्यांचे खेळातील उपजत गुण शोधणेही शक्य झाले असेही डॉ. मॅथ्यू यांनी सांगितले.

Quepem Collage Football Team, (Goa Sports)
Tokyo Olympics: लेक खेळतीय परदेशात, तिला पाहण्यासाठी वीजच नाही गावात

गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 या शैक्षणिक वर्षांत कोविडमुळे गोवा विद्यापीठातर्फे एकही आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा झाली नाही. तरीसुद्धा आम्ही महाविद्यालयातील आंतर क्रिडा स्पर्धा बंद ठेवल्या नाहीत. सर्व नियमांचे पालन करुन या स्पर्धा पूर्ण करण्यात आल्या आहेत. टेबल टेनिस, टेनिकोईट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलिबॉल, अॅथलेटिक्स या क्रिडा प्रकारातील आंतर वर्ग स्पर्धा पुर्ण केल्या. शिवाय महाविद्यालय शिवाय महाविद्यालयाचा विद्यार्थी परशुराम कोळी याने 23 वर्षाखालील राज्य साईकल शर्यतीत भाग घेऊन दुसरे स्थान प्राप्त केले. शिवाय परशुराम सोबत हरिश्र्चंद्र वेळीप, क्लेविन कार्वाल्हो, प्रदीप कोल्हापटे यांनी 200 किमी सायकल शर्यतीतही भाग घेतला.

Quepem Collage Football Team, (Goa Sports)
Tokyo Olympics: पहिल्याच ऑलंपिकमध्ये लव्हलिनाने मारला पदकाचा पंच

दिव्येश शिरसाट, अमन राऊत देसाई यांनी राज्य बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेतला. जानिवो फर्नांडिस याला कोलकाता येथील मोहमेडन स्पोर्टिंग क्लबने करारबद्ध केला. शिवाय महाविद्यालयातील 20 विद्यार्थिनी गोवन हॉकीने आयोजित स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडुन खेळल्या. वेदांत कारेकरने 21व्या स्क्वेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. अभिषेक अरुण कुंकळयेकर व शिलिप वेळीप यांचा राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिरात निवड झाली. शिवाय महाविद्यालयातर्फे स्वर्गीय श्री व श्रीमती मॅथ्यू शिष्यवृत्ती पाच विद्यार्थ्यांना देण्यात आली. ही माहिती क्रिडा विभागाचे प्रमुख डॉ. राजन मॅथ्यू यानी दिली.

Quepem Collage Football Team, (Goa Sports)
बुद्धिबळ संघटनेच्या आगामी निवडणुकीसाठी 28 उमेदवारी अर्ज

गेल्या 30 वर्षांतील महाविद्यालयाची क्रिडा क्षेत्रातील कामगिरी

(1) 4 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला

(2) 32 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.

(3) 223 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला

(4) गोवा विद्यापीठ आयोजित महाविद्यालयिन स्पर्धांमध्ये 5 नवे स्पर्धा विक्रम प्रस्थापीत

(5) विद्यापीठातर्फे आयोजित स्पर्धांमध्ये 157 सांघिक विजेतेपद व इतर संस्थातर्फे आयोजित स्पर्धांमध्ये 67 विजेतेपद.

(6) क्रिडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 3 वेळा

(7) गोवा विद्यापीठा तर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान एकदा

(8) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपदे 4.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com