Goa Forward Party Leader Ram Rao Vagh Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: अर्ज विक्रीतून सरकारनं केली 15 लाखांची कमाई; 944 जागांच्या भरती प्रक्रियेवर आपकडून सवाल उपस्थित

Goa Forward Party: तत्पूर्वी, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी आज (26 ऑक्टोबर) पणजीत पत्रकार परिषद घेवून या भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

Manish Jadhav

राज्याच्या मनुष्यबळ विकास महामंडळाकडून 944 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी आज (26 ऑक्टोबर) पणजीत पत्रकार परिषद घेवून या भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. यासाठी एक अर्ज 50 रुपयांना विकण्यात आल्याचे सांगत त्यांनी घणाघात केला. या अर्जांच्या विक्रीतून सरकारने तब्बल 15 लाखांची कमाई केली. एवढ्यावरच न थांबता पक्षाचे नेते रामराव वाघ यांनी भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याने ती रद्द करण्याची मागणी केली.

भरती प्रक्रिया ऑनलाईन नव्हती

पत्रकार परिषदेत बोलताना वाघ म्हणाले की, ''मनुष्यबळ विकास महामंडळाकडून करण्यात आलेली भरती प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपाची नव्हती. अर्जांची विक्री रोख पैसे घेवून करण्यात आली. ज्यावेळी महामंडळाकडून अर्जांची विक्री सुरु झाली तेव्हा उमेदवारांना तासन् तास वाट पाहावी लागली. आता विक्री संपलीय. महामंडळ 30 हजार उमेदवारांची मुलाखत घेणार का? घेणार असेल तर कोणत्या पद्धतीने नियोजन करणार?''

आरक्षण देण्यात आलं नाही

वाघ पुढे म्हणाले की, 'या जागांवर भरती करताना यामध्ये एससी, एसटी किंवा ओबीसी समाजासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण (Reservation) ठेवण्यात आलेले नाही. याबाबत आम्ही एससी एसटी आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र आयोगाने देखील आमच्या तक्रारीला उत्तर देणे योग्य समजले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT