Goa Recruitment: शाळांसाठी शिक्षण खात्याच्या मीडिया साइटवर भरतीची जाहिरात अपलोड करणे आवश्यक !!

Goa Education Department: ज्या दिवशी शाळ पदांची जाहिरात वर्तमानपत्रात देतील त्याच दिवशी एक कॉपी खात्याच्या मीडिया साईटवर जाणं गरजेचं
Goa Education Department: ज्या दिवशी शाळ पदांची जाहिरात वर्तमानपत्रात देतील त्याच दिवशी एक कॉपी खात्याच्या मीडिया साईटवर जाणं गरजेचं
Education Department GoaDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षण खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील शाळांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी केलेल्या जाहिरातीची एक कॉपी शिक्षण खात्याच्या मीडिया साईटवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

राज्यातील शिक्षण संचालक शैलेश झिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शाळांनी नवीन पदांसाठी केलेल्या जाहिरातीची माहिती समाविष्ट करणे महत्वाचे आहे, कारण यानंतरच त्यांना पदांसाठी भरती करण्याची परवानगी मिळणार आहे.

ज्या दिवशी शाळा या पदांची जाहिरात वर्तमानपत्रात देतील त्याच दिवशी एक कॉपी खात्याच्या मीडिया साईटवर जाणं गरजेचं आहे असंही शैलेश झिंगाडे म्हणालेत. या नवीन योजनेमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत या पदांची माहिती पोहोचायला मदत मिळेल.

Goa Education Department: ज्या दिवशी शाळ पदांची जाहिरात वर्तमानपत्रात देतील त्याच दिवशी एक कॉपी खात्याच्या मीडिया साईटवर जाणं गरजेचं
Goa Recruitment: सुवर्णसंधी! लवकरच तीन हजार पदांची भरती; आयोगाच्या हालचालींना वेग

कर्मचारी भरती आयोगाकडून लवकरच तीन हजार पदांची भरती:

राज्‍य सरकार कर्मचारी भरती आयोगाकडून कर्मचारी भरती करणार की खात्यांनाच पुन्हा ते अधिकार दिले जातील याची एक मोठी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत तिन हजार पदे भरण्यासाठी जाहिराती जारी करण्याची तयारी आयोगाने केली आहे. येत्या काही दिवसांत त्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आयोगाकडून पदे संगणकाधारीत परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com