ST Political Reservation dainik gomantak
गोवा

ST Political Reservation: एसटी राजकीय आरक्षण; विजय सरदेसाईंचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र

गोव्याच्या अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी तातडीने लक्ष घालावे अशी विनंत सरदेसाई यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ST Political Reservation: राज्यातील अनुसूचित जमातींना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षणाची मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांना लिहले आहे. गोव्याच्या अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी तातडीने लक्ष घालावे अशी विनंत सरदेसाई यांनी पत्राद्वारे केली आहे.

"संविधानाच्या कलम 330 अंतर्गत अनुसूचित जमातींना लोकसभेत आणि कलम 332 अंतर्गत विधानसभेत राजकीय आरक्षण दिले जाते. त्यामुळे गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण द्यावे. 2003 मध्ये राज्यातील गावडा, कुणबी आणि वेळिप यांची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आल्याने त्यांची राज्यातील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यातील अनुसूचित जमातींची संख्या आठ पर्यंत गेली आहे."

"2011 च्या लोकसंख्येनुसार राज्यातील अनुसूचित जमातींची लोकसख्या 10.23 टक्के झाली आहे. पण, मागील वीस वर्षांपासून हा समाज लोकसभा आणि विधानसभेत राजकीय आरक्षणापासून वंचित आहे." असे सरदेसाईंनी पत्रात म्हटले आहे.

'संसदीय समितीने दिलेल्या दिशानिर्देशानंतर राज्यातील आदिवासी कल्याण संचालनालयाच्या वतीने विधानसभेत चार जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला. पण, मागील दोन महिन्यांपासून त्याला सरकारकडून हिरवा कंदील मिळत नाही, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत देखील याबाबत आश्वासन दिले होते.' असे सरदेसाईंनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अलिकडेच गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) गोव्यात झालेल्या सभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर सभेत सांगितले होते. 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसचटी समाजाला आरक्षण देणार असल्याचा पुनरूच्चार सावंतानी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT