South Goa Power Shutdown: संपूर्ण दक्षिण गोव्यात रविवारी आठ तास राहणार वीज पुरवठा बंद

मागील काही दिवसांपासून रखडलेली दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त वीज पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे खात्याने म्हटले आहे.
South Goa Power Shutdown
South Goa Power ShutdownDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa Power Shutdown: दक्षिण गोव्यात येत्या रविवारी (दि.30 एप्रिल) आठ तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. वार्षिंक दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त वीज पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे वीज खात्याने म्हटले आहे.

(Annual shutdown in South Goa on Sunday 30 April will be no power eight hours)

वीज खात्याने प्रसिद्धी केलेल्या पत्रकानुसार, रविवारी वार्षिक देखभाल आणि दुरूस्ती निमित्त दक्षिण गोव्यातील फोंडा तालुका वगळता सर्व भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत असेल असे खात्याने म्हटले आहे.

दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 केव्ही सबस्टेशन, कुंक्कळी येथील 220 केव्ही आणि वेर्णा येथील 110 केव्ही सबस्टेशनची दुरूस्ती आणि देखभाल संबधित काम केले जाणार आहे. असे वीज खात्याने पत्रकात म्हटले आहे.

South Goa Power Shutdown
South Goa: दक्षिण गोव्यात शनिवारी वीज खंडित करण्याचा निर्णय तूर्तास मागे

कोणत्या भागात नसेल वीज

संपूर्ण काणकोण तालुका, सासष्टी, सांग, केपे, मुरगाव आणि धारबांदोडा तालुक्यातील काही भाग. तसेच, फोंडा तालुक्यातील काही भाग म्हणजेच पंचवाडी ग्राम पंचायत भागात वीज पुरवठा खंडीत असेल.

मागील काही दिवसांपासून रखडलेली दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त वीज पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, गोवा वीज खात्याच्या वतीने मार्च महिन्यात दक्षिण गोव्यात (South Goa) नियोजित वार्षिक दुरूस्ती आणि देखभाल केली जाणार होती. यासाठी 11 मार्च रोजी दक्षिण गोव्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित राहणार होता. दरम्यान, शिगमोत्सवामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यानंतर येत्या रविवारी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com