Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : गृहमंत्र्यांनी आता घरीच बसणे योग्य; सरदेसाईंचा खोचक टोला

ड्रग्स प्रकरणामुळे राज्याची देशभरात बदनामी झाल्याची विजय सरदेसाई यांची टीका

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : ड्रग्स प्रकरणाची चौकशी करताना गोवा पोलिसांनी सहकार्यच केले नाही, असा आरोप हैदराबाद येथील पोलिस महासंचालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केले आहे.

राज्याची झाली तेवढी बदनामी खूप झाली. आता गृहमंत्र्यांनी घरीच बसणे योग्य होईल, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी ड्रग्स व्यवसायात गोवा स्वयंपूर्ण होत असल्याचे हे संकेत आहेत, असे टीकास्त्र सोडले आहे. सरदेसाई यांनी केलेल्या ट्विटमध्ये गोव्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे, अशी टीका केली.

‘ड्रग्स डेस्टिनेशन’मध्ये गोवा ‘स्वयंपूर्ण’

दुसऱ्या बाजूने युरी आलेमाव यांनी केलेल्या ट्विटमध्ये, ‘2018 मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या कारखान्यातून कॅटामाईन ड्रग्सचा प्रचंड साठा जप्त करण्याची घटना ते आज इतर राज्यांच्या पोलिसांनी गोवा पोलिसांना दिलेले ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी असहकाराचे प्रमाणपत्र हे भाजपच्या राजवटीत गोवा ‘ड्रग्स डेस्टिनेशन’ म्हणून ‘स्वयंपूर्ण’ बनल्याचे प्रतिबिंब आहे, असे युरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT