Panjim Pollution : काम्पाल परिसरात धुळीचे प्रदूषण

खोदकाम सुरूच असल्याने वाहनचालकांसह इस्पितळातील रुग्णांनाही त्रास
Panjim Pollution
Panjim PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Pollution : पणजी शहरातील कांपाल परिसरातील बालभवन ते अग्निशामक दलाच्या कार्यालयापर्यंतच्या मार्गावर दुतर्फा खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामामुळे धुळ सर्वत्र पसरते. त्याचा त्रास कांपाल हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच दुचाकीस्वारांना नाहकपणे सोसावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या बाजूचे वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ते काम पावसामुळे रखडले होते. आता कामाला गती आली आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदकाम केला गेला असल्याने माती रस्त्यावरच टाकली जात आहे. खोदकाम झाल्यानंतर ती माती जेसीबीच्या साह्याने उचलून नेली जात आहे. परंतु जेसीबीने रस्त्यावरील माती साफ होत नाही. उन्हामुळे ओली माती सुकल्यानंतर तिची धूळ उडू लागलते. येणाऱ्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे धूळ उडाल्याने दुचाकीस्वारांना त्याचा त्रास होतो. हेल्मेट घातले तरी कपड्यावर या धुळीचे कण जमा होतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे वाहन हळूहळू गेले तर खाण भागातून आल्यासारखा पेहराव होतो.

Panjim Pollution
CM Pramod Sawant : गोव्यात वाळू उपसा कायदेशीर करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

थॉमस गॅरेजकडे सांतिनेज खाडीवरील पुलाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे त्या मार्गावरून हॉटेल इंटरनॅशनल किंवा कृषी खात्याकडे जाण्यासाठी अग्निशामक दल ते बालभवन या मार्गाचाच वापर करावा लागतो. काम सुरू असले तरी धुळीचा त्रास नाहक दुचाकीस्वार आणि लगतच्या इस्पितळातील रुग्णांना सहन करावा लागतो, त्याचे काय? दुपारी मातीवर पाण्याचा फवारा मारावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com