डिचोली: म्हावळींगे येथील पोर्तुगिजकालीन (portuguese) 'फायरींग तळ' दिवसेंदिवस असुरक्षित आणि धोकादायक बनत चालला आहे. या तळावरील फायरींग रेंजमधून गोळ्या बाहेर सुटून नागरिक (Citizen) जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण म्हावळींगे गाव भीतीच्या छायेत वावरत आहे. तरीदेखील सुरक्षेच्यादृष्टीने (Safety) उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
सरकारच्या गृह खात्याने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून त्वरित उपाययोजना केली नाही, तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. असा इशारा गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे. मागील जानेवारी महिन्यात फायरींग रेंज मधून बाहेर सुटलेली बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या महिलेला अद्याप न्याय मिळालेला नाही. उलट राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. गृह खात्याने याप्रकरणी त्वरित फौजदारी गुन्हा नोंद करावा. अशी मागणीही विजय सरदेसाई यांनी केली आहे. मये मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी गोवा फॉरवर्डच्या अन्य नेत्यांसह विजय सरदेसाई यांनी काल (रविवारी) सायंकाळी म्हावळींगे गावाला भेट दिली. त्यावेळी गोवा फॉरवर्डने ही मागणी केली.
म्हावळींगे तळावर फायरींगचे प्रशिक्षण घेताना बंदुकीच्या गोळ्या बाहेर सुटण्याच्या घटना घडत आहेत. काही महिन्यापूर्वी फायरींगवेळी निसटत्या गोळ्या लागून काहीजण किरकोळ जखमीही झाल्याची माहिती आहे. अशाच एका घटनेत गेल्या जानेवारी महिन्यात जखमी झालेल्या उर्मिला उमेश गावकर या महिलेची तिच्या घरी भेट घेवून तिची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी म्हावळींगेतील फायरींग तळ असुरक्षित असल्याचा दावा केला. सरकारने या तळावर सुरक्षेची उपाययोजना करावी. अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली. यावेळी फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, दुर्गादास कामत, संतोष सावंत, पिडीत महिला उर्मिला गावकर आणि तिचे कुटुंबिय उपस्थित होते.
संरक्षक भिंत प्रस्ताव
दरम्यान, पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हावळींगेतील तळ हा एकमेव तळ असल्याने तो बंद करणे शक्य नाही. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (सोमवारी) नार्वे येथे बोलताना स्पष्ट केले. जनतेच्या सुरक्षेसाठी या फायरींग तळावर संरक्षक भिंत बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोर्तुगिजकालीन फायरींग तळ
म्हावळींगे पठरावर असलेला या फायरिंग तळाची पोर्तुगिजांनी बांधणी केली आहे. पोर्तूगिज राजवटीत या तळावर पोर्तुगिज जवानांना फायरींगचे प्रशिक्षण देण्यात येत होते. गोवा मुक्तीनंतर गोवा सरकारकडे या फायरींगचा ताबा आला. तेव्हापासून राज्य पोलिस सेवेतील पोलिसांसह आर्मी, नौदलाचे जवान या तळावर 'फायरींगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावरून मागील काही महिन्यांपासून हा फायरींग तळ वादातीत बनला आहे. हा फायरींग तळ बंद करावा. अशी मागणीही पुढे येत आहे. मध्यंतरी आमदार प्रवीण झांट्ये यांनी या तळाची पाहणी केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.