Goa Forward fatorda candidate Vijay Sardesai has most assets Dainik Gomantak
गोवा

Goa Election: सासष्टीतील बहुतांश उमेदवार गर्भश्रीमंत

सर्वाधिक मालमत्ता गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा फातोर्ड्याचे उमेदवार विजय सरदेसाई यांच्याकडे आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सासष्टीतील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली जंगम व स्थावर मालमत्ता जाहीर केली असून ती कोट्यवधींची आहे. बहुतांश उमेदवार कोट्यधीश असून गर्भश्रीमंत आहेत. (Goa Forward fatorda candidate Vijay Sardesai has most assets)

सर्वाधिक मालमत्ता गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा फातोर्ड्याचे उमेदवार विजय सरदेसाई यांच्याकडे आहे. त्याची व पत्नीची मालमत्ता एकूण 37 कोटींच्या घरात पोहोचते. त्याची जंगम मालमत्ता 8.94 कोटी व स्थावर मालमत्ता 28.22 कोटी रुपयांची अशी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व मडगावचे भाजपचे उमेदवार मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी घोषित केल्या प्रमाणे त्यांची व त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 2.88 कोटी रुपयांची असून स्थावर मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे.

विरोधीपक्ष नेते तथा मडगावचे कॉंग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत Digambar kamat यांनी जंगम मालमत्ता 8.73 कोटी रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. फातोर्ड्याचे भाजप उमेदवार दामोदर नाईक 5 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

बाणावलीचे तृणमूल कॉंग्रेसचे Goa TMC उमेदवार चर्चिल आलेमाव Churchil Alemao यांची मालमत्ता 8 कोटी रुपयांची आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार वेन्झी व्हिएगस यांनी आपली मालमत्ता 3.47 कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. नुवेचे कॉंग्रेस उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांनी आपली मालमत्ता 10 कोटींची असल्याचे जाहीर केले आहे.

तर अपक्ष उमेदवार विलफ्रे़ड डिसा यांची मालमत्ता 20 कोटी रुपये, तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार जुझे राजु काब्राल यांची मालमत्ता 5.78 कोटी रुपयांची आहे.तर, आपचे कुडतरीचे उमेदवार डॉमनिक गावकर यांची जंगम मालमत्ता 3.38 कोटींची व स्थावर मालमत्ता 18.72 कोटींची आहे. नावेलीच्या तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार वालंका आलेमाव यांची जंगम मालमत्ता 1.69 कोटींची व स्थावर मालमत्ता 2.50 कोटींची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT