Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: BJP सरकारला आमदार फोडण्यातच रस; दिलेल्या आश्वासनांचे काय?

Goa Mine: सहा महिन्यांत खाणी सुरु करु, असे सांगणाऱ्या भाजपला आश्वासनांचा विसर पडला का?

दैनिक गोमन्तक

Goa News: विधानसभा निवडणुकीवेळी गृहमंत्री अमित शहा यांना खाण पट्ट्यात फिरवून गोव्यात भाजप सत्तेवर आल्यास सहा महिन्यांत खाणी सुरू करू, असे सांगणाऱ्या भाजपला आश्वासनांचा विसर पडला का, असा सवाल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. या सरकारला खाणी सुरू करण्यापेक्षा विरोधी पक्षांचे आमदार फोडण्यातच स्वारस्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचा ताबा घेऊन आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्‍वभूमीवर सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देताना, ‘आजपासून खाणी सुरू होणार का?’ असा सवाल ‘ट्विट’द्वारे केला आहे. सत्तेवर आल्यानंतर या सरकारने खनिज महामंडळ स्थापन करून खाणी परत सुरू करणार, असे सांगितले होते. मात्र, त्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत.

खनिज पट्ट्यातील लोक भुकेल्या अवस्थेत आहेत. आमदार फोडण्यात वेळ घालविण्याऐवजी खाणींचा लिलाव करून त्या सुरू करण्यात तत्परता दाखवावी. हा लिलाव करताना पूर्ण ब्लॉकचा लिलाव न करता प्रत्येक खाणीचा वेगळा लिलाव करावा, जेणेकरून सगळ्या खाणी कुणा एकाच्याच घशात जाण्यापासून वाचतील, अशी प्रतिक्रियाही सरदेसाई यांनी व्यक्त केली.

लोकांचा सरकारवर वचक नाही: पुती गावकर

खाणी सुरू व्हाव्यात यासाठी लोकांनी सरकारवर दबाव आणण्याची गरज होती; पण लोकांचाच सरकारवर वचक नाही, अशी प्रतिक्रिया मायनिंग पीपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी व्यक्त केली. गावकर म्हणाले, आम्ही खाणी सुरू व्हाव्यात, यासाठी लोकांनी काय करावे, यासंबंधी जागृती केली.

खाणी सुरू होत नसल्याबद्दल लोकांच्या मनात खदखद आहे. मात्र, लोकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखविले की निवडणूक जिंकता येते, हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच सरकार बेफिकीर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT