Goa Former MLA Lavoo Mamledar  Dainik Gomantak
गोवा

Goa Ex- MLA Death: खून का हृदयविकाराचा झटका? गोव्याच्या माजी आमदाराचा बेळगावात मृत्यू

Goa Former MLA Lavoo Mamledar Dies: बेळगावातील खडेबाझार येथे माजी आमदार लवू मामलेदार आणि रिक्षा चालक यांच्यात वाद झाला.

Pramod Yadav

Goa Former MLA Lavoo Mamledar Dies

बेळगाव: गोव्यातील माजी आमदार लवू मामलेदार यांचा बेळगावात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रिक्षा चालकाशी झालेल्या वादानंतर मामलेदार अत्यवस्थ झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. लवू मामलेदार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बेळगावातील खडेबाझार येथे माजी आमदार लवू मामलेदार आणि रिक्षा चालक यांच्यात वाद झाला. रिक्षाला कारचा धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. बाचाबाचीत मामलेदार यांना मारहाण झाल्याची देखील माहिती मिळाली आहे.

मामलेदार पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती गोमंतक टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे.

माजी आमदार लवू मामलेदार यांचा खून झाल्याचा देखील दावा केला जात आहे. पण, अद्याप याबाबत काही ठोस माहिती समोर आलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. बेळगाव पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

राजकीय कारकिर्द

लवू मामलेदार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर २०१२ साली फोंडा मतदार संघातून निवडून आले होते. २०१७ साली त्यांचा काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून पराभव झाला. काही काळासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT