Pandurang Raut Dainik Gomantak
गोवा

Pandurang Raut अनंतात विलीन; डिचोलीचा 'विकासपुरुष' हरपला!

Goa news: डिचोलीतील पांडुरंग राऊत यांच्‍या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Bicholim: डिचोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी वाहतूकमंत्री पांडुरंग राऊत (76) यांच्‍या पार्थिवावर काल सोमवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी साळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र दत्ताराम राऊत यांनी मंत्राग्नी दिला.

अल्पशा आजारामुळे राऊत यांच्यावर गेला महिनाभर म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. आज सोमवारी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍‍वास घेतला. ते एक शांत, सुस्वभावी असे व्‍यक्तिमत्त्‍व होते.

आपल्‍या मृदू स्वभावामुळे ते जनमानसात 'भाई' म्हणून परिचित होते. मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्‍यांनी डिचोलीचा विकास केला. म्‍हणून ‘डिचोलीचा विकासपुरुष’ अशी त्‍यांना उपमा मिळाली. शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी खोलपेवाडी-साळ येथे शिवाजीराजे हायस्कूल तर मुळगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले.

दरम्‍यान, राऊत यांच्‍या निधनाची बातमी समजताच शिवाजीराजे विद्यालयात श्रद्धांजली वाहून एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला.

राजकीय कारकीर्द 1989 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पांडुरंग राऊत यांनी प्रथमच डिचोली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते निवडून आले. 1999 साली झालेल्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विजयी झाले.

फेब्रुवारी 1991 ते एप्रिल 1994 या काळात ते मंत्री होते. त्यांनी वाहतूक, समाजकल्याण, आरोग्य अशा महत्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला. 2017 पर्यंत ते मगो पक्षात होते. त्‍यानंतर त्यांनी ‘गोवा प्रजा पार्टी’ हा पक्ष स्थापन केला. 2017 साली डिचोलीतून त्‍यांनी शेवटची निवडणूक लढविली होती.

विकासाचा ध्यास

पांडुरंग राऊत यांनी डिचोलीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी डिचोली शहराचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला. डिचोली कदंब बसस्थानक, उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, वाहतूक ही सरकारी कार्यालये त्यांच्याच मंत्रिपदाच्या कार्यकाळात झाली.

मान्यवरांनी घेतले दर्शन

पांडुरंग राऊत यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ पसरली. सकाळी त्यांचे पार्थिव ते वास्तव्यास असलेल्या करासवाडा-म्हापसा येथील निवासस्थानी नेण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार दिगंबर कामत, ज्‍योशुआ डिसोझा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी मुख्‍यमंत्री दिगंबर कामत, प्रा. लक्ष्‍मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी सभापती राजेश पाटणेकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मगोचे कार्यकर्ते नरेश कडकडे आदींनी राऊत यांचे अंत्‍यदर्शन घेतले.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार-

राऊत हे शांत आणि विनम्र असे व्यक्तिमत्व. त्यांच्यासारखी व्यक्ती राजकारणात मिळणे दुर्मीळ. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डिचोलीच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

नरेश कडकडे, मगो कार्यकर्ते, डिचोली-

पांडुरंग राऊत हे अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते. डिचोलीच्या विकासाचे ते शिल्पकार होते. महत्वाकांक्षी प्रकल्प, रस्ते आदी अनेक विकासकामे मार्गी लावून डिचोली मतदारसंघाला त्‍यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. रवींद्र भवन, क्रीडा संकुल या प्रकल्पासाठी ते प्रयत्नशील होते.

लक्ष्‍मीकांत पार्सेकर, माजी मुख्‍यमंत्री-

पांडुरंग राऊत यांचा स्‍वभाव शांत होता. मंत्री म्‍हणून काम करताना त्‍यांनी गोव्‍याचा विचार केला. संस्‍कृती टिकली पाहिजे, गोव्‍याचे वैभव जगात पोचले पाहिजे, यासाठी त्‍यांनी कार्य केले. सर्वांचे विचार ऐकून ते निर्णय घेत असत.

राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी-

राऊत यांनी पर्यावरणमंत्री असताना गोव्‍याचे पर्यावरण नष्‍ट होणार नाही याची काळजी घेतली. तिळारीचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, या दृष्‍टीने त्‍यांनी कार्य केले. त्‍यांचे हे कार्य वाखाणण्‍याजागे असेच आहे.

ॲड. रमाकांत खलप, माजी केंद्रीयमंत्री-

पांडुरंग राऊत यांनी मगो पक्षाचे कार्य करताना सर्वस्‍व पणाला लावले. विधानसभेत आम्‍ही मगो पक्षाचे आमदार म्‍हणून बरोबर कार्य केले. शिक्षण, संस्‍कृती, सहकार क्षेत्रात राऊत यांचे कार्य मोठे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT