luizinho faleiro 
गोवा

माजी मुख्यमंत्र्यांची गोव्यात ओळख काय? गांधीजींशी तुलना करत सांगितला किस्सा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईझील फालेरो (luizinho faleiro) यांना राज्यातील कर्मचारी आणि लोकं ओळखत नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फालेरो (luizinho faleiro) यांना राज्यातील कर्मचारी आणि लोकं ओळखत नाही हे ऐकायला जरा अजब वाटेल. मात्र गोव्याच्या माजी माजी मुख्यमंत्र्यांसोबत (Goa Former Cm) विमानतळावर (Airport) असाच काहीसा किस्सा घडला. (Goa Former Chief Minister Luizinho Faleiro is not known to state employees)

गुरुवारी विधानसभेत माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख केला. लुईजिन्हो फालेरो यांनी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ट्रेनमधून महात्मा गांधींना वर्णद्वेषामुळे हद्दपार केल्याच्या घटनेची आठवण करून देत हा किस्सा विधानसभेत सांगितला. कॉंग्रेस कार्यकारिणीचे माजी सदस्य फालेरो यांनी राज्याच्या एकमेव विमानतळावर गोव्यातील तरूणांना राजगार देण्यासंबधी शून्य तासाचा प्रस्ताव मांडताना या प्रसंगाची माहिती दिली.

फालेरो म्हणाले की, दुसऱ्या दिवशी, सुमारे दोन -तीन वर्षांनी मी विमानतळावर गेलो. मी व्हीआयपी लाऊंजमध्ये गेलो. तिथे त्यांने मला विचारले तूम्ही कोण आहात? मी म्हणालो तुम्ही कुठून आहात? तुम्ही गोव्याचे आहात का? फालेरो दोन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते म्हणाले की माननीय मुख्यमंत्री, मला अपमानित वाटले नाही कारण दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींसोबत हे घडले. पण हे माझ्यासोबत आणि माझ्याच गोव्यात घडेल अशी मला अपेक्षा नव्हती. महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना रेल्वे टर्मिनलवर ढकलून देण्यात आले होते. मी आभारी आहे की मला माझ्या सामानासह गोवा विमानतळाबाहेर फेकण्यात आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT