फातोर्डा - सद्याच्या या कोविड महामारीच्या (Covid Pandemic) काळात मनोरंजन उद्योगाला (Entertainment industry) जबरदस्त नुकसान सोसावे लागत आहे. राज्य सरकारने गोमंतकीय संगीत (Music), गायक (Singer) व मनोरंजन (Entertainment) करणाऱ्या कलाकारांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो (MLA Luizinho Faleiro) यांनी सरकारला केली आहे.
गोवा मनोरंजन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत फालेरो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या कलाकारांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना तयार करावी व त्यांना फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी असे फालेरो यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले.
करोनाच्या परिस्थितीत कलाकारांना कुठलेही कार्यक्रम करता येत नाहीत त्यामुळे त्यांच्या मिळकतीला खिळ बसलेली आहे. उदरनिर्वाहासाठी कलाकारांना वणवण फिरावे लागते.
कर्फ्यु, राज्यात लागू केलेल्या 144 कलमामुळे व सामाजीक अंतराची अट असल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम, नृत्य व विवाह संमारंभ करता येत नाही, त्यामुळे कलाकारांचे उत्पन्न घटले आहे , असे गोवा मनोरंजन असोसिएशनचे अध्यक्ष हर्शेल मास्कारेन्हस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.