हुतात्मा स्मारक

 

Dainik Gomantak

गोवा

Goa: हुतात्मा स्मारकांचा पडला विसर..!

हुतात्मा स्मारकाचा विकास करून, या हुतात्मा स्मारकाचे महत्व आजच्या पिढीला ज्ञात झाले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: एकाबाजूने गोवा राज्य मुक्तीदिनाची षष्टी साजरी करीत असतानाच, डिचोली शहरातील 'हुतात्मा स्मारक' मात्र दुर्लक्षित राहिलेले आहे. स्वातंत्र्यदिन ( Independence Day) आदी काही राष्ट्रीय सणांवेळी पुष्पाजली वाहण्याचा कार्यक्रम सोडल्यास हुतात्म्यांच्या त्यागाचे प्रतीक असेलेले शहरातील 'हुतात्मा स्मारक' दिवसेंदिवस विस्मृतीत होत चालले आहे.

स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणारे आणि तालुक्याचे स्फूर्तीस्थान असलेले शहरातील हे हुतात्मा स्मारक उपेक्षित आहे. मध्यंतरी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या स्मारकाला काहीसी झळाळी देण्यात आली होती. हा अपवाद सोडल्यास स्मारक दुर्लक्षित राहिलेले आहे. या हुतात्मा स्मारकाचा विकास करून, या हुतात्मा स्मारकाचे महत्व आजच्या पिढीला ज्ञात व्हावे, त्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. असा सूर राष्ट्रप्रेमी (Patriot) नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहरातील केंद्रशाळा (school) आवारात एका कोपऱ्यात हे 'हुतात्मा स्मारक' उभारण्यात आले आहे. मुक्तीलढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या फटबा सदा नाईक, सोमा रामा मळीक, रामचंद्र हरि नेवगी, बाबलो नारायण गवस आणि अर्जुन गाड या डिचोली आणि परिसरातील हुतात्म्यांच्या नावाचा उल्लेख आहे. नाही म्हटले, तरी स्वातंत्र्यदिन आदी काही राष्ट्रीय सणांवेळी पालिकेतर्फे तसेच अन्य काही सामाजिक संघटनांच्यावतीने या हुतात्मा स्मारकावर पुष्पंजली अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. हा अपवाद सोडल्यास या स्मारकाजवळ विशेष कार्यक्रम होत नाही. हे हुतात्मा स्मारक सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही. खेदाची बाब म्हणजे आजच्या पिढीला या स्मारकाबद्दल माहिती आहे की नाही, त्याविषयी साशंकता आहे.

महात्माजींच्या पुतळ्याचे स्थलांतर

शहरातील या हुतात्मा स्मारकाजवळ पुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी (Mahatma Gandhi) यांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र 41 वर्षांपुर्वी म्हणजेच 2 ऑक्टोबर 1980 या दिवशी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे तेथून जुन्या बसस्थानकाजवळ स्थलांतर करण्यात आले. महात्मा गांधीजींचा पुतळा होता, त्यावेळी गांधी जयंती आदी राष्ट्रीय सणांवेळी केंद्रशाळेच्या परिसरात साफसफाई करून हे सण साजरे करण्यात येत असे. हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरणही करण्यात येत असे. मात्र, महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे स्थलांतर केल्यानंतर हुतात्मा स्मारक विस्मृतीत गेले आहे.

स्मारकाजवळ अस्वच्छता

सध्या हुतात्मा स्मारकाजवळ शाळा इमारत प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे स्मारक परिसर बांधकाम साहित्याने व्यापला आहे. स्मारकाकडे जाणाऱ्या वाटेवरही चिखल निर्माण झाला आहे. निदान येत्या रविवारी साजरा होणाऱ्या गोवा मुक्तीदिनी तरी स्मारक परिसर स्वच्छ आणि सुशोभीत असावा. अशी शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT