
पोलिस पिंक फोर्स
Dainik Gomantak
राज्यातील महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस खात्याने ‘पिंक फोर्स’ची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. पिंक फोर्सची ही वाहने पर्यटकांच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध असतील. ही पथके तपासकामापेक्षा गुन्हे रोखण्यावर अधिक भर देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मिरामार किनाऱ्यावर पोलिस (Police) पिंक फोर्स उदघाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार बाबूश मोन्सेरात, अभिनेत्री पूजा बेदी, महिला व बाल विकास संचालक दीपाली नाईक आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. फोर्सच्या वाहनांना मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला. फोर्सची गुलाबी रंगाचा साज चढवलेली 11 वाहने 24 तास गस्तीवर राहणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन केले
Dainik Gomantak
गुलाबी रंगाचा साज चढवलेली महिला पोलीस
Dainik Gomantak
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सह इतर मान्यवर
Dainik Gomantak
यावेळी डॉ. सावंत म्हणाले, कोणत्याही अडचणीवेळी महिलांनी पोलिस खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर (1091, 100 किंवा 102 ) कॉल केल्यास तसेच व्हॉटसप क्रमांक 7875756177 वर संदेश पाठविल्यास पोलिस त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील.
मिरामार समुद्रकिनारा (Beach) येथे पोलिस खात्यातर्फे पोलिस पिंक फोर्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार बाबुश मोन्सेरात, चित्रपट अभिनेत्री पूजा बेदी, महिला व बाल विकास संचालक दिपाली नाईक, पोलिस खात्याचे अधिकारी उपस्थित होते. पोलिस पिंक फोर्सच्या वाहनांना मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले.
टोल फ्री क्रमांक :
1091, 100, 102
WhatsApp क्रमांक :
7875756177
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.