Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Bondla Zoo: वनमंत्री अंधारात, बोंडला प्राणी संग्रहालय बंद केल्याची माहितीच नाही; अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Bondla Wildlife Sanctuary: मी वनमंत्री असूनही प्राणी संग्रहालय बंद करण्यात येत असल्याची माहिती मला का दिली गेली नाही; विश्वजीत राणेंचा सवाल.

गोमन्तक डिजिटल टीम

Bondla Wildlife Sanctuary

सत्तरी: बोंडला प्राणी संग्रहालयात संसर्गजन्य आजारामुळे तीन उद मांजर आणि दोन रान मांजरांचा मृत्यू झालाय. यामुळे प्राण संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यानांच अंधारात ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्रकरणाची मंत्री राणे यांनी गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

बोंडला प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले; मात्र याबाबत वनमंत्री म्हणून मला कोणतीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी भूमिका वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केली.

मी वनमंत्री असूनही प्राणी संग्रहालय बंद करण्यात येत असल्याची माहिती मला का दिली गेली नाही, याबद्दल संबंधित अधिकाऱ्याने स्पष्टीकरण द्यावे, अशी आपण मागणी केली असून, याबाबत आजच आढावा बैठक घेतली जाणार आहे, असेही मंत्री राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सादर करणार आहे, असा त्यांनी निर्वाळाही दिला.

तसेच, राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने छापे तसेच कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अशीच सुरूच राहणार आहे. बनावट रंग तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांद्वारे होणारा आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही, असा कडक इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी (०८ एप्रिल) दिला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून विविध आस्थापने तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंटस् वर छापे टाकले जात आहेत. या छाप्यांमध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळून आली आहे. आरोग्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची हयगय सहन करणार नाही. अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई चालूच राहणार आहे. यासंबंधीचा अहवाल आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सादर करणार असून कुठली पावले उचलावीत, यासंदर्भात चर्चाही करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT