Food And Drug Administration Dainik Gomantak
गोवा

Food And Drug Administration: नियुक्त अधिकारी पद थेट भरण्यास कोर्टाचा दणका, सरकारला दिले 'हे' आदेश

Food And Drug Administration: ‘एफडीए’मध्ये बढती पद्धतीने पद भरण्याची प्रक्रिया महिनाभरात करा : उच्च न्यायालय

गोमन्तक डिजिटल टीम

Food And Drug Administration: अन्न व औषध प्रशासन खात्यातील डेसिग्नेटेड ऑफिसर (नियुक्त अधिकारी) हे महत्त्वाचे पद थेट भरतीने भरण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अखेर ‘खो’ बसला आहे.

हे पद बढतीने भरण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

माशांमध्ये फॉर्मेलिनचे अंश सापडल्याचा दावा केल्यावरून प्रसिद्धीस आलेली आयव्हा फर्नांडिस या डेसिग्नेटेड ऑफिसर 31 डिसेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद बढतीऐवजी थेट भरतीने भरण्याचा प्रयत्न सरकारने चालवला होता.

सरकारच्या विनंतीवरून गोवा लोकसेवा आयोगाने हे पद भरण्यासाठी 11 फेब्रुवारी 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले होते. याला खात्यातील अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यांच्या याचिकेवर आदेश जारी करताना हे पद थेट भरतीने भरण्याऐवजी बढतीने भरावे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी महिनाभरात सरकारने आयोगाला कळवावे, असेही उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

या खटल्याची माहिती अशी की, अ वर्ग राजपत्रित अधिकारी भरती नियम 2014 नुसार या पदांपैकी निम्मी पदे केवळ बढतीनेच भरता येतात, असा दावा कुडाळकर यांनी याचिकेत केला होता. त्या १९ जानेवारी १९९४ रोजी ‘अन्न निरीक्षक’ या पदावर त्या रुजू झाल्या.

त्या १९ जानेवारी २००२ मध्ये साहाय्यक स्‍थानिक (आरोग्य) अधिकारिणी पदासाठी पात्र ठरल्या होत्या.

प्रत्यक्षात त्यांना ते पद २९ जुलै २०११ रोजी देण्यात आले आणि त्‍यांची त्या पदावरील सेवा ५ डिसेंबर २०११ रोजी नियमित केली. अन्न सुरक्षा प्रमाणिकरण कायदा २०११ मध्ये लागू केल्यानंतर हे पद ‘वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी’ असे करण्यात आले.

डेसिग्नेनेटेड ऑफिसर या पदावर थेट भरतीने 34 वर्षीय रिचर्ड नोरोन्हा यांची नियुक्ती केली, तर बढतीने आयव्हा यांना या पदावर नियुक्त केले होते.

आयव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद भरण्यासाठी खात्याने आयोगाला कळवले आणि आयोगाने जाहिरात प्रसिध्द केली.

त्यात अर्जदाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असू नये, असे नमूद केले. नियमानुसार ते 40 पेक्षा जास्त असू नये. त्यात विशिष्ट वर्गासाठी 5 वर्षांची सूट असे म्हणायला हवे होते, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

खात्यात नव्या दमाच्या अधिकाऱ्यांची भरती करणे आवश्यक असल्याचा मुद्दा सरकारने मांडला होता. सरकारी कर्मचाऱ्याला बढतीसाठी मागणी करण्याचा मूलभूत हक्क नाही.

तो अधिकार सरकारला असतो. याचिकेत नोकर भरती नियमांना आव्हान दिलेले नाही. इतर खात्यांतही तरुणांना संधी देण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांची पदे थेट आयोगामार्फत भरण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT