गोव्यात वसतिगृहात काम करत करायचा ड्रग्ज तस्करी, हैद्राबादमध्ये आंतरराज्य टोळी जेरबंद

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी आणि सात मोबाईल जप्त केले आहेत.
Interstate Gang Involved in Drug Trafficking Arrested In Hyderabad
Interstate Gang Involved in Drug Trafficking Arrested In HyderabadDainik Gomantak
Published on
Updated on

Interstate Gang Involved in Drug Trafficking Arrested In Hyderabad: तेलंगणा राज्य अमली पदार्थ विरोधी पथकाने (TSNAB) अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पथकातील अधिकारी आणि सायबराबाद आयुक्तालयाच्या चंदननगर पोलिसांच्या मदतीने केलेल्या या संयुक्त कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 18 ग्रॅम MDMA अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

पथकाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गोव्यातील एक, आंध्र प्रदेशातील दोन आणि दोन हैदराबादच्या तस्करांना अटक केली आहे.

गोवा येथील रहिवासी अखिल एमजी (रा.गोवा), सूर्या किसन, रोहन पॉल (दोघेही रा. आंध्र प्रदेश) आणि थोटा सुरेंद्र व बेले अरुण कुमार (रा. हैदराबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींचे वय 19 ते 24 दरम्यान आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी आणि सात मोबाईल जप्त केले आहेत.

अखिल मूळचा केरळचा आहे. अखिल गोव्यात राहतो आणि तेथील एका वसतिगृहात व्यवस्थापक म्हणून काम करत, तो गोव्यातील पर्यटकांना ड्रग्जचा पुरवठा करत होता, असे TSNAB एसपी गुम्मी चक्रवर्ती यांनी स्थानिक वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

सूर्या किसन आणि रोहन पॉल हे गोवा दौऱ्यावर असताना अखिलच्या संपर्कात आले. दोघेही अखिलकडून नियमितपणे ड्रग्ज खरेदी करत होते आणि हैदराबाद व आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील ग्राहकांना त्याची विक्री करत होते. इतर दोन पेडलर, सुरेंद्र आणि अरुण यांची सूर्य किसानशी ओळख झाली आणि ते त्याच्याकडून MDMA विकत घ्यायचे आणि पैशांसाठी ग्राहकांना विकायचे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com