Goa News | Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Goa News: फोंडा मार्केट संकुल पूर्णपणे खुले होणार- रवी नाईक

Goa News: दिवाळीच्या पूर्वसंध्येला रवी नाईक यांनी मार्केट संकुलाला भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना आवश्‍यक सूचना केल्या.

दैनिक गोमन्तक

Goa News: वीज ट्रान्स्फॉर्मरअभावी फोंड्यातील नवीन मार्केट संकुल पूर्णपणे वापरात येत नसल्याने येत्या काही दिवसांत ट्रान्स्फॉर्मर उभारल्यानंतर हे मार्केट संकुल पुन्हा गजबजेल, असे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले. काल (रविवारी) दिवाळीच्या पूर्वसंध्येला रवी नाईक यांनी मार्केट संकुलाला भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना आवश्‍यक सूचना केल्या. (Goa News)

फोंड्यातील बुधवारपेठचे हे नूतन मार्केट संकुल रवी नाईक यांनीच उभारले होते, पण नंतरच्या काळात रवी नाईक हे आमदार नसल्याने या मार्केट संकुलाच्या प्रकल्पाचा पुढील विचार झालाच नाही, त्यामुळेच अनेक सुविधांअभावी हे मार्केट संकुल अर्धवटच खुले राहिले. विशेष म्हणजे या मार्केट संकुलाला वीज ट्रान्स्फॉर्मरची आवश्‍यकता आहे.

त्यासाठी फोंडा पालिकेने पुढाकार घेतला असून वीज खात्याकडे सातत्याने संपर्क करून वीज ट्रान्स्फॉर्मर उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्केट संकुल पुन्हा एकदा पूर्णपणे कार्यरत राहणार आहे.

तसेच,त्यामुळे विक्रेता आणि ग्राहकांची चांगली सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रवी नाईक यांची बुधवारपेठ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी भेट घेऊन समस्यांसंबंधी चर्चा केली, त्यावर लवकरच यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही रवी नाईक यांनी दिली.

दिवाळीसाठी केली खरेदी

रवी नाईक यांनी बाजार संकुलातील विक्रेत्यांकडून दिवाळीसाठी खरेदीही केली. विक्रेत्यांचे प्रश्‍न त्यांनी यावेळी समजून घेतले. फोंड्यातील मार्केट संकुलात तालुक्यातील ग्राहक खरेदीसाठी येतात, त्याचबरोबर फोंड्यासह धारबांदोडा व सत्तरी तालुक्यातील विक्रेतेही बाजारात माल घेऊन येत असल्याने या लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही रवी नाईक यांनी दिली.

मार्केटवर शेड उभारणीचे काम

नवीन मार्केट संकुलाच्या स्लॅबवर सध्या शेड उभारणीचे काम सुरू असून त्यानंतर याठिकाणी विक्रेत्यांना स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर मासळी मार्केटच्या ठिकाणी अद्ययावत सुविधांनी युक्त नवीन मार्केट संकुल उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले. फोंडा पालिकेकडून फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचेही नगराध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT