सावर्डे, ता. २ (खास प्रतिनिधी): सावर्डे (Savardem) पूरग्रस्तांच्या नशिबातील व्यथा अजूनही दूर झालेल्या नाहीत. येथे अजूनही काहींच्या अंगणात (Front of the house) पुराच्यावेळी (Flood) साचून राहिलेले पाणी (Water) तसेच आहे. दारात ढोपरभर पाणी, पण घरात पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही नाही अशी त्यांची सध्या परवड झाली आहे.
महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी मडगाव महिला काँग्रेस अध्यक्ष डोरिस टेक्सेरा, सावर्डे युवा काँग्रेस अध्यक्ष गौतम भंडारी, एनएसयूआयचे संकेत नाईक यांच्यासह धडे, काले येथील पुरात बाधा आलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या लोकांना गरजेच्या वस्तू दिल्या. गुरुवारी त्यांनी हा दौरा केला होता. या पूरग्रस्त भागाची व्यथा मांडताना बीना नाईक यांनी सांगितले, की या मतदारसंघात ७५ टक्के भागात सध्या पाण्याची समस्या सतावत आहे. ज्या ठिकाणाहून पाणी आणले जायचे, तिथे खाणीचे पाणी भरून हे जलसाठे दूषित झाले आहेत, तर दुसरीकडे घरातील नळांनाही पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांचा हा मतदारसंघ असूनही ते या लोकांचे पाण्याचे हाल दूर करू शकत नाहीत. याचेच आश्चर्य वाटते. धडे या गावात खनिज मालाची चढ उतार जिथे होत होती ते ओरबीनच पुरात वाहून गेले असून येथील माती खचून जाऊ लागल्याने नदीच्या जवळ असलेल्या घरांना धोका वाढला आहे. येथे रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम करताना नदीतील माती उपसल्याने आता नदीची धडा कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.