Goa: डिचोलीत पुरामुळे 1.43 कोटींचे नुकसान

अहवाल सादर, पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत (Goa)
The house was flooded, In Bicholim - Goa. On 23 July, 2021
The house was flooded, In Bicholim - Goa. On 23 July, 2021Tukaram Sawant / Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दहा दिवसांपूर्वी पुरामुळे (Flood) बसलेल्या तडाख्यात डिचोली (Bicholim) तालुक्यात घरे आणि शेती-बागायतींचे एकूण एक कोटी 43 लाख 68 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे (Property damage). नुकसानीचा अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकारी (Collector of North Goa) प्रशासकीय यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत नुकसान भरपाई (Indemnity) देण्याचे सरकारने (Goa Govt.) जाहीर आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे ()Flooded आता भरपाईकडे लक्ष लागून राहिलेले आहे. (Goa)

The house was flooded, In Bicholim - Goa. On 23 July, 2021
Goa: चोर्ला घाटात झाडे पडून वाहतुकीचा खोळंबा

तीनशे घरांना फटका

पावसाच्या कोसळधारांमुळे आणि अतिवृष्टीमुळे गेल्या 23 जुलै रोजी डिचोली तालुक्यातील साळ, हरवळेसह पिळगाव, आमोणे आदी अनेक भागात पुराचा तडाखा बसला होता. सुपाची कोंड-हरवळे, साळ आदी काही गावांना तर पुराने वेढा दिला होता. पुराच्या तडाख्यात हरवळेसह अन्य भागात घरांची पडझड झाली आहे. तालुक्यात एकूण 374 घरांना पुराची झळ बसली. त्यात सगळ्यात जास्त आमोणे येथे 101 तर सुर्ला येथे 74 घरांचा समावेश आहे. पुराचा 1 हजार 735 जणांना फटका बसला. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या हरवळे, सारमानस, भामई आदी भागातील 40 जणांची बचाव पथकाने सुरक्षितपणे सुटका करण्यात यश मिळवले. (300 houses Damage)

The house was flooded, In Bicholim - Goa. On 23 July, 2021
Goa: खवळलेल्या समुद्रात तीन बोटी बुडाल्या

घरांची 1.28 कोटी रुपयांची हानी

पडझड वा घरादारांनी पाणी घुसून जवळपास 1 कोटी 28 लाख 68 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. डिचोलीचे मामलेदार तथा आपत्कालीन यंत्रणेचे प्रमुख प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार संबंधित पंचायतींच्या तलाठयांनी नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. तालुक्यात शेती-बागायतींचे मिळून 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली शेती नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सदर नुकसानीचा अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com