Goa: Collapsed House In Vante-Sattari. Dainik Gomantak
गोवा

Goa: अजूनही शेजाऱ्यांच्‍या घरातूनच चालतो संसार

Goa: रस्त्याअभावी बोणकेवाडा-वांते येथे साहित्य पोहोचण्यास अडथळा

Dasharath Morjkar

पर्ये : बोणकेवाडा-वांते सत्तरी (Vante, Sattari-Goa) येथील उत्तम व पांडुरंग गावडे या दोन्ही भावांचे एकत्रित असलेले घर २३ जुलैच्या म्हादईच्या महापुराने (Flood In Goa) जमीनदोस्त झाल्याने ही कुटुंबे बेघर झाली होती. घर कोसळून आज २० दिवस उलटून देखील सरकारकडून घर उभारणीला आर्थिक मदत दिली नसल्याने घराच्‍या उभारणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. हे कुटुंब त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरीच वास्तव करीत असून, दुसऱ्याच्या घरातून आपला संसार चालवत आहे.

वांतेतील बोणकेवाडा हा अत्यंत दुर्गम भाग आहे. म्हादईच्या तिरी वसलेल्या या गावात पक्क्या रस्त्याची सोय नाही. रस्त्याअभावी या पूरग्रस्त कुटुंबाला मदत पोहोचण्यास अडथळा होत असल्याचे वृत्त दैनिक ‘गोमन्‍तक’ने याआधी प्रसिध्द केले होते. आता रस्ता नसल्यानेच घर उभारणीचे साहित्य याठिकाणी पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. वांतेहून या भागात कच्चा रस्ता आहे, पण सध्‍या पावसाळा असल्याने या रस्त्यावरून ते साहित्य घेऊन वाहने येत नाहीत. त्यामुळे येथे घर उभारणीची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे रस्त्याअभावी घरबांधणीचे लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या कुटुंबाने घराचा कोसळलेला ढिगारा काही प्रमाणात हटवला आहे.

गणेश चतुर्थीसाठी तात्पुरता आसरा उभारणार

या कुटुंबाचे घर कोसळल्याने वर्षातील महत्त्‍वाचा असलेला गणेश चतुर्थी हा सण कुठे साजरा करावा, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. यासाठी त्यांनी घर कोसळलेल्या ठिकाणी चुडतांचा माटव उभारून तात्पुरता निवारा करून गणेश चतुर्थी साजरी करण्याचा बेत आखला आहे. या संबंधी उत्तम गावडे यांनी सांगितले, की गणेश चतुर्थी साजरी करण्याचे सोडू शकत नाही. त्यामुळे कोसळलेल्या घराच्या ठिकाणी माटव उभारून हा सण साजरा करणार आहे. तसेच नवीन घर उभारणीसाठी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्याअभावी येथे वाहने आणता येत नसल्याने घर उभारणीची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन घर उभारणी दुसऱ्यांवर अवलंबून

गरीब असलेल्या या कुटुंबाचे नवीन घर उभारणे पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून आहे. मुळात गरीब असलेल्या आदिवासी समाजाच्या या कुटुंबाकडे घर उभारणीसाठी पैसेच नाहीत. तसेच त्यांच्याकडे बचतही नाही. त्यामुळे घर उभारणीसाठी त्यांना पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना सध्‍या स्थानिक राज्यकर्त्यांनी घर उभारण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्यावरच त्यांची भिस्त आहे.

मुलांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने

बोणकेवाडा येथील या कुटुंबात तीन मुलांपैकी एक मुलगा इयत्ता अकरावीत आहे. त्याची अजून शाळा सुरू झाली नाही. तर एक मुलगी इयत्ता नववीला आहे. या भागात मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी या वाड्यावरील मुलांनी एका जंगलाच्या ठिकाणी नेटवर्क मिळते तिथे माटव उभारून ऑनलाईन शिक्षणाची सोय केली आहे. पूरग्रस्त घरातील मुलगी याच ठिकाणी बसून शिक्षणाचे धडे घेत आहे.

गांजेतील पूरग्रस्तांच्या घरांचे बांधकामही नाही

सत्तरीला लागून असलेल्या फोंडा तालुक्यातील गांजे येथे म्हादईच्या महापुराने चार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. या चारही घरांचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. येथेही सरकारने आश्वासन दिले खरे, पण प्रत्यक्षात त्यांची मदत अजून पोहोचली नाही. कोसळलेल्या घरांचा ढिगारा काही प्रमाणात उचलण्यात आला आहे. पण अजूनपर्यंत घरे उभारण्यासाठीचे साहित्य आणलेले नाही. यातील काही लोकांनी आपल्या शेजारी किंवा आसपासच्या गावातील आपल्या पाहुण्यांच्या घरी आसरा घेतला आहे. दिवसा ही मंडळी या ठिकाणी येतात व रात्रीच्या वेळी पुन्हा जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT