Goa: भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रबोधनाचा आणि बहुजनसमाजाचा वारसा चालवला

भाऊंचे चरित्र ढगे यांनी लिहावे; खलप (Goa)
Bandodkar Vyakhyanmala, Mandrem vikas parishad, (Goa)
Bandodkar Vyakhyanmala, Mandrem vikas parishad, (Goa)nivrutti Shirodkar / Dainik Gomantak
Published on
Updated on

महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी म्हटले होते, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका विध्येने केले(Quote of Mahatma Phule). भाऊसाहेब बांदोडकर (1st CM of Goa Bhausaheb Bandodkar) यांनी महात्मा फुले वाचले होते कि माहित नाही. परंतु हा जो काही बांदोडकर यांनी बहुजनसमाजाच्या प्रभोधनाचा वसा व वारसा एका प्रतिकूल परिस्थितीतून चालवला, शाहूमहाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज आणि डॉक्टर आंबेडकर या प्रबोधनकारांचा अर्क भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कृतीत आणि विचारात होता असे प्रतिपादन पत्रकार प्रभाकर ढगे यांनी बांदोडकर व्याख्यानमालेत केले. (Goa)

Journalist Dhage speaking at the Bandodkar Vyakhyanmala, Goa
Journalist Dhage speaking at the Bandodkar Vyakhyanmala, Goanivrutti Shirodkar / Dainik Gomantak

दरवर्षी मांद्रे विकास परिषद, बांदोडकर व्याख्यानमाला ही भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करतात, या वर्षी आयोजित केलेल्या व्याख्यान मालेत पत्रकार प्रभाकर ढगे बोलत होते. यावेळी मांद्रे विकास परिषद चेरमेन रमाकांत खलप, प्रा.अरुण नाईक, अजय देसाई, सरपंच सुभाष आसोलकर, माजी जिल्हासदस्य श्रीधर मांजरेकर व अमित सावंत आदि उपस्थित होते. विकास परिषद मांद्रे, सप्तेश्वर इन्स्टिट्यूट, मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स शिक्षणिक संस्थेचा सप्ताह साजरा केला जात आहे, आणि या सप्ताहात दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केल जाते. त्यानुसार यंदा बांदोडकर पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Bandodkar Vyakhyanmala, Mandrem vikas parishad, (Goa)
Goa: भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नादब्रह्म संस्थेतर्फे भजनाचा कार्यक्रम

पत्रकार प्रभाकर ढगे यांनी पुढे बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविषयी अनेक प्रसंग आहे. राजाराम रंगाजी पैगीणकर यांनी गोमंतक समजाविषयी खूप काही लिहिले त्यांनीही भाऊसाहेब बांदोडकर याना राजकारणात आणले. समाजकारणातून राजकारणाचा प्रवास बांदोडकर यांनी सुरु केला. गोवा सर्वाथाने प्रगतीवर आणण्याचे काम त्यांनी केले.मानावतावादिचा गौरव करून समानतेचे काम भाऊने केले , राजकारणापेक्षा समाजकारण मानणारे भाऊ होते. संसदेसमोर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला त्यात त्या काळात त्या पुतळ्यासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांचे २५००० पंचवीस हजार रुपयांचे योगदान आहे असे ढगे यांनी सांगितले. पत्रकार ढगे यांनी यावेळी जी नवीन शिक्षण पद्धत सुरु केली आहे ती चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आता जागृती करून शिक्षण प्रणालीचा अभ्यास करण्याचे आवाहन ढगे यांनी सांगितले.

Bandodkar Vyakhyanmala, Mandrem vikas parishad, (Goa)
Goa: गायन स्पर्धेत गोव्याचा हृषीकेश ढवळीकर द्वितीय तर आर्याला तृतीय पुरस्कार

भाऊंचे चरित्र ढगे यांनी लिहावे ; खलप

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप (Former Union Minister Ramakant Khalap) यांनी बोलताना भाऊसाहेब बांदोडकर यांचे चरित्र पत्रकार प्रभाकर ढगे यांनी लिहावे असे आवाहन केले . राजकारणात आपण आमदार मंत्री खासदार असो नसो जे कार्य आहे ते आपण याहीपुढे चालूच ठेवणार असल्याचे सांगितलले. आपण कधी राजकारण करत नाही समाजकारण करतो. समाजाप्रती भावना आहे ते प्रतिबिंब कार्यातून दिसते. भाऊंचे शिक्षणावरचे प्रेम होते, ते मंत्री होण्यापूर्वीही ते शिक्षणावर प्रेम करायचे , त्याचे किस्से माजी मंत्री रमाकांत खलप यांनी सांगितले.

अनघा आजगावकर व वरदा तळकर यांनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .प्रा. अरुण नाईक यांनी बांदोडकर विषयी महत्वपूर्ण माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com