Goa News | Nilkanth Halarnkar
Goa News | Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

Goa News: सर्व मच्छीमार जेटींवर सीसीटीव्ही बसविणार- निळकंठ हळर्णकर

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात बेकायदेशीरीत्या एलईडी मासेमारी होत असल्याचे उघड झाल्यानंतर मच्छीमार खात्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे मच्छीमार खाते बऱ्यापैकी सक्रिय झाले असून हे बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलताना सर्व मच्छीमार जेटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली.

राज्यात शाश्‍वत मासेमारीला चालना देण्याची गरज असून एलईडी मासेमारी कोणत्याही स्थितीत बंद होईल याची दक्षता घेणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून वास्को येथील खारीवाडा जेटीवर काम सुरु झाले आहे.

राज्यातील इतर जेटींवरही लवकरच काम सुरू होणार आहे. एखाद्या जेटीवर एलईडी मासेमारी होत असल्याचे पुरावे मिळाल्यास त्या जेटीवरील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT