वास्को खारीवाडा येथे जेटीवर मच्छिमार बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलीप डिसोझा मच्छीमार बोटींचीचे पाहणी करताना. Dainik Gomantak
गोवा

Goa: डिझेलवरील व्हॅट काढून खास सूट देण्याची गोवा फिशिंग बोट संघटनेची मागणी

१ ऑगष्ट पासून मच्छीमारी बंदीकाळ उठत असून त्यासाठी खारी वाडा जेटीवर मच्छीमारीसाठी ट्रॉलर्स सज्ज ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेटीचा तसेच इतर कामांचा पूर्व आढावा घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष फिलिप डिसोझा आले असता ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा सरकारने (Government of Goa) मच्छीमारी ट्रॉलर्ससाठी लागणाऱ्या डिझेलवरील व्हॅट काढून खास सूट देण्याची मागणी गोवा फिशिंग बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza, President of Goa Fishing Boat Owners Association) यांनी केली आहे.

१ ऑगष्ट पासून मच्छीमारी बंदीकाळ उठत असून त्यासाठी खारी वाडा जेटीवर मच्छीमारीसाठी ट्रॉलर्स सज्ज ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेटीचा तसेच इतर कामांचा पूर्व आढावा घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष फिलिप डिसोझा आले असता ते बोलत होते. गेल्यावर्षी डिझेल ५४ रुपये होते, या वर्षी ते ९५ रुपये झाले आहे. आताचा नवीन दर लहान ट्रोलर मालकांना परवडणार नसून तो त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण कित्येक खेपेस मासे जाळ्यात अडकणारच असे नाही. मासे भेटले तर चार पैसे मिळणार. नाही तर नुकसानीला सामोरे जावे लागते. तेव्हा सरकारने याविषयी विचार करून डिझेलवर सूट देण्याची तरतूद करावी जेणेकरून ट्रॉलर मालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे ते म्हणाले. कारण फिं शिंग ट्रॉलर मालक डिझेलच्या वाढीव दरामुळे चिंताग्रस्त झाले आहे. या वाढीव दरामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोक्याचे बनले असल्याचे ते म्हणाले.

१ ऑगष्ट पासून सुरु होणाऱ्या मच्छीमारी हंगामाची पूर्वतयारी येथील खारीवाडा जेटीवर जोमाने सुरू आहे.

१ ऑगष्ट पासून सुरु होणाऱ्या मच्छीमारी हंगामाची पूर्वतयारी येथील खारीवाडा जेटीवर जोमाने सुरू आहे. खारीवाडा जेटी धक्क्यावर सदर फिशिंग ट्रॉलर्स डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे खारीवाडा मच्छिमारी जेटी गजबजून गेली आहे. काही ट्रॉलर्स मालकांनी यापूर्वीच मच्छीमारी बंदी काळात आपल्या ट्रॅव्हल्सच्या व जाळ्याचे काम करून घेतले. तर आता उर्वरित ट्रॉलर्स मालक ट्रॉलर्सच्या डागडुजीचे काम करून घेत आहेत. ट्रॉलर्स मालक मच्छीमारीसाठी सज्ज झाले आहे.

ट्रॉलर्स वरील कामगार अजून गावातून परतले नसल्याने मच्छीमारी व्यवसायिक चिंतेत आहे.

येत्या दोन-तीन दिवसात राज्यात मच्छीमारी व्यवसाय सुरू होणार आहे. मात्र त्याच्या ट्रॉलर्स वरील कामगार अजून गावातून परतले नसल्याने मच्छीमारी व्यवसायिक चिंतेत आहे. ते आपल्या कामगारांची परतीची वाट पहात आहे. मच्छीमारी बंदी काळात ते आपल्या गावी गेले होते. त्यासाठी त्यांना मालकाकडून येण्या जाण्याची आगाऊ तिकीट दिली जाते. तसेच त्यांची गावातून परत येण्याची खातरजमा करून घेतले घेतली जाते. त्यानुसार त्यांना गावी जाण्यास मोकळीक देण्यात येते. मच्छीमारी व्यवसाय दोन महिने बंद असल्याने कामगारांच्या रहाण्या खाण्याचा खर्च न परवडणारा असतो. त्यामुळेच त्यांना गावी जाण्यास मुभा देण्यात येते. जास्त कामगार ओडीसा व झारखंड येथील असून मोजकेच कामगार आपल्या गावातून परतले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी सांगितले.

पुढील दोन-तीन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनाही दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान सद्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पुढील दोन-तीन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनाही दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार एक ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या मच्छीमार हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

SCROLL FOR NEXT