Goa : वास्को विकासात बॅकफुटवर

विकासकामांना विघ्‍ने प्रचंड : मासळी मार्केट, सिग्‍नेचर प्रकल्‍प, कदंब बसस्‍थानक रखडले (Goa)
Goa : Vasco Kadamba Bus Stand.
Goa : Vasco Kadamba Bus Stand.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : एकेकाळी गोव्यातील (Goa) सर्वांत लहान शहर (Small city) म्हणून ओळखले जाणारे वास्को शहर आता राज्यात सर्वाधिक लोकसंख्या (Population) असलेले शहर म्हणून नावारूपास आले आहे. पोर्तुगीज काळात या शहरातील लोकसंख्या काही हजारांच्या संख्येत होती. पण, गोवा मुक्तीनंतर या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. या शहरात देशभरातील सर्व धर्म, पंथांचे लोक राहत असल्याने या शहराला ‘मिनी इंडिया’ (Mini India) या नावानेही काहीजण ओळखू लागले आहेत. वास्को शहराची स्थापना झाल्यास शंभर वर्षे पूर्ण झाली, तरी या शहराचे शताब्दी वर्ष साजरे काही कोणी साजरे केलेच नाही. शहराचा नियोजनबद्ध आराखडा (Plan) सुरवातीलाच तयार केला होता. शहरात मध्यभागी असलेले सर्व सरळ अंतर्गत रस्ते या नियोजनाची साक्ष देतात.

Goa : Vasco Kadamba Bus Stand.
Goa Election 2022: मान्द्रेची कॉंग्रेस उमेदवारी कुणाला?

१९८९ साली वास्को मतदारसंघासाठी पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे सायमन डिसोझा यांनी विजय प्राप्त केला होता. १९९४ साली मगो-भाजपमध्ये युती झाली आणि मगोचे डॉ. विल्फ्रेड मिस्किता हे विजयी ठरले. त्यानंतरच्या निवडणुकीत युगोडेपाचे जुझे फिलिप डिसोझा, त्‍यानंतर भाजपचे राजेंद्र आर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप डिसोझा विजयी झाले. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे कार्लुस आल्मेदा यांनी विजय प्राप्त केला. मतदारसंघामध्ये मुरगाव पालिकेचे एकूण बारा प्रभाग आहेत. यात बायणातील बराचसा भाग, मेस्तवाडा, बेलाबाय, मायमोळे, मांगोरहिल, गांधीनगर, नवेवाडे, शांतीनगर, खारीवाडा, वास्को शहर, वाडे हा भाग समाविष्ट आहेत.

समस्‍यांच्‍या विळख्‍यात
विकासकामांच्या बाबतीत हा मतदारसंघ बॅकफूटवर असल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. शहरातील मासळी मार्केटचा प्रश्न ३० वर्षांहून अधिक काळ उलटला, तरी सुटलेला नाही. या ना त्या कारणाने या प्रकल्पाला आडकाठी येत आहे. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव योजनेंतर्गत मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी सिग्नेचर प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित झाले होते. तो बंगलाही पाडला. दोनवेळा निविदा झाल्या, मात्र तांत्रिक अडचणींचे कारण पुढे येत असल्याने प्रकल्प काही पुढे सरकत नाही. २७ जुलै २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. तेथे वर्षभरात प्रकल्प उभा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

Goa : Vasco Kadamba Bus Stand.
Goa: वेळसाव समुद्र किनाऱ्यावर बंपर कोळंबी

प्रकल्‍प रखडले
मुंडवेल येथे असलेला कदंब बसस्थानक प्रकल्प पाच वर्षे रखडत चालला आहे. स्वत: कदंबचे चेअरमन असूनही आमदार आल्मेदा यांना हे काम पुढे नेता आलेले नाही. बेलाबाय चिरेकोन उडी येथील मैदान विकासाची योजना अद्याप मार्गी लागलेली नाही. सध्या ही जागा टाकाऊ साहित्यासाठी आणि वाहने पार्किंगसाठी वापरली जात आहे. मैदानाच्या विकासासाठी सव्वा कोटीहून अधिक खर्च असून केंद्र आणि राज्य सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्याची तयारी सरकारने दाखवली होती. सदर जागा काही वर्षांपूर्वी जलतरण तलावासाठी मातीचा भराव घालून बुजवण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या ठिकाणी जलतरण तलाव उभारण्याची योजना रद्द करण्यात आली. शहरातील पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय अजूनही निघत नाही. कदंब स्थानकाजवळील अग्निशामक दलासाठी इमारत बांधण्याचा प्रस्तावही रखडलेला आहे. बायणातील पावर हाऊसच्या जागेत व्यावसायिक प्रकल्प उभारला जाणार आहे.

Goa : Vasco Kadamba Bus Stand.
शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: हळर्णकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com