fisherman saves tourist  Dainik Gomantak
गोवा

Chapora Jetty : खडकावर अडकलेल्या केरळमधील पर्यटकास वाचवले; बोटचालकाचे धाडस

महत्प्रयास करून आणले सुखरूप किनाऱ्यावर

दैनिक गोमन्तक डिजिटल

शापोरा जेटीजवळील समुद्री खडकावर अडकून पडलेल्या एका तरुणास स्थानिक बोटचालकाने सुखरूप वाचविण्याची घटना रविवारी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना रविवारी (ता. 9) सकाळी 10 च्या सुमारास घडली. केरळमधील दोन पर्यटक हे शापोरा जेटीजवळील खडकावर गेले होते. तेव्हा भरतीमुळे पाणी अचानकपणे वाढले. या प्रकारामुळे दोघेही घाबरले व माघारी परतताना दीपू पी. के. हा तरुण खडकावरच अडकून राहिला, तर त्याचा मित्र राहुल संतोष हा स्वतःहून तेथून कसाबसा बाहेर पडला.

राहुल हा दुसऱ्या खडकावर बसला होता. माघारी येताना आपला मित्र कुठेच दिसत नसल्याने तो प्रचंड घाबरला आणि या भीतीपोटी त्याने या घटनेची कोणाला माहितीही दिली नाही. सुमारे तासभर दीपू या खडकावरील पाण्यात अडकून पडला होता.

दीपू पी. के. हा या प्रकारामुळे बराच भयभीत झाला होता. वेळेत बोटचालक राज हा तिथे पोहोचल्याने केरळमधील या तरुण पर्यटकाचा जीव वाचू शकला. राज चोडणकर हा मासेमारी करून परत धक्क्यावर येत होता..

दीपूकडे फेकले लाईफ जॅकेट !

यावेळी स्थानिक बोटचालक राज चोडणकर (रा. गुडे - शिवोली) याने या खडकावर अडकलेल्या दीपूला पाहिले. त्यानंतर राजने आपली बोट दीपूच्या दिशेने वळवून त्याला मदत पोहचावी, या हेतूने बोटमधील लाईव्ह जॅकेट त्याच्याजवळ फेकले. ते त्याने घेऊनही तो घाबरला होता.

मात्र राज याने त्यास सुखरूप पाण्यातून बोटवर घेत त्याला किनाऱ्यावर आणले. राजच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT