Bicholim : बंधाऱ्यावर जात आहात; लहान मुलांना सांभाळा

असुरक्षित वाठादेव बंधारा : अंघोळीसाठी नागरिकांची गर्दी
Bicholim Dam
Bicholim DamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : उष्णतेचा पारा चढून उकाडा असह्य झाला आणि अंगाची लाही-लाही होऊ लागली, की प्रत्येकाला शीतल पाण्याचा थंडगार गारवा हवाहवासा वाटतो. अशावेळी मग प्रत्येकाला नदी, तलाव, बंधारे आदी जलस्रोते खुणावू लागतात. यंदा तापमानात प्रचंड बदल होवून उकाडा असह्य होऊ लागल्याने डिचोलीतील काही भागातील जलस्रोतांवर आंघोळीसाठी गजबजाट होत असल्याचे दिसून येत आहे.

रविवारी बंधाऱ्यांवर गजबजाट जाणवत असतो. चिंतेची बाब म्हणजे आंघोळीसाठी असुरक्षित असलेल्या ''वाठादेव'' बंधाऱ्यावर सध्या चक्क लहान मुलांचा गजबजाट वाढत असल्याचे आढळून येत असून, मुलांच्या बंधाऱ्यावरील मुक्त वावराबाबतीत भीती व्यक्त होत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या बंधाऱ्यावरील लहान मुलांच्या वावरावर नियंत्रण येणे आवश्यक आहे.

Bicholim Dam
दाभाल बंधारा केला शेतकऱ्यांनी साफ | Agriculturists clean up Dabal bandhara | Gomantak Tv

साखळी, कुडचिरेत गर्दी

डिचोली तालुक्यातील साखळी, कुडचिरे आदी काही ग्रामीण भागात जलस्रोत खात्यातर्फे लहान बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी काही बंधारे आंघोळीसाठी आकर्षित करतात. गेल्या जवळपास बारा वर्षांपासून वाठादेव बंधारा आंघोळीसाठी चर्चेत आलेला आहे. सुटीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांची या परिसरात गर्दी वाढलेली आहे.

बंधारा असुरक्षित

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येणारा हा बंधारा आंघोळीसाठी तसा सुरक्षित नाही. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खोल असून, ज्याठिकाणी आंघोळ करतात, त्या पाण्यात पाणी खेचणारे मोठे पाईप आहे. या बंधाऱ्यावर सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना नाही. आतापर्यंत या बंधाऱ्यात तिघांना जीव गमावावा लागला आहे. एका शालेय विद्यार्थ्याचाही बळी गेलेला आहे.

Bicholim Dam
Bicholim News : डिचोलीत अखेर जलवाहिनी दुरुस्त, पाणीपुरवठा पूर्ववत

सतर्कता आवश्यक

मध्यंतरी या बंधाऱ्यावरील गजबजाट कमी झाला होता. पण यावर्षी उष्णतेचा पारा चढल्याने हा बंधारा गजबजू लागला आहे. युवकांबरोबरच लहान मुले या बंधाऱ्यावर आंघोळीची मजा लुटताना दिसून येतात. शाळांना सुटी पडल्याने लहान मुलांचा बंधाऱ्यावर गजबजाट असतो. विशेष करून रोलिंग मिल परिसरातील काही मुलांचा या बंधाऱ्यावर अधिक वावर असतो, या छोट्या मुलांवर हवे, पालकांनी या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेच असून सर्वांनी सतर्कतेने लक्ष द्यावे, असे ज्‍येष्ठ नागरिकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com