Goa Fisheries Directorate Dainik Gomantak
गोवा

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

मत्स्यव्यवसाय संचालनालयाने किनारी गस्त मजबूत करण्यासाठी आणि किनाऱ्याजवळ होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी, मच्छिमारांच्या होड्या तासाच्या दराने भाड्याने घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय संचालनालयाने किनारी गस्त मजबूत करण्यासाठी आणि किनाऱ्याजवळ होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी, मच्छिमारांच्या होड्या तासाच्या दराने भाड्याने घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

या होड्या उत्तर गोव्यातील दोन किनारी हरमल व कळंगुट, तर दक्षिण गोव्यातील तीन गावे बाणावली, बायना आणि तळपण येथे किनारी ठिकाणी तैनात केल्या जातील. होड्यांवर १० एचपी क्षमतेची मोटर असावी आणि तिची लांबी ३० ते ३८ फूट दरम्यान असणे आवश्यक आहे. त्या होडीवर चालकासह किमान दोन कर्मचारी असणे आवश्यक आहे.

जीवरक्षक उपकरणे (लाइफजॅकेट आणि लाइफबॉय), अग्निशमन उपकरणे आणि इतर लागू सुरक्षा साधनांनी सुसज्ज होडी असावी. त्या होड्या चांगल्या स्थितीत असाव्यात आणि त्यात पुरेसे पेट्रोलही (इंधन) असावे. तसेच मत्स्यव्यवसाय संचालनालयाच्या मागणीनुसार होडी उपलब्ध करून दिली पाहिजे, होड्यांवरील सर्व कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

होडीसमवेत व्हेसल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (व्हीआरसी) आणि मच्छिमार परवाना असावा, ठरवलेला दर निविदा उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी आणि प्रति तास आधारावर वैध असणार आहे, निविदेत होडी भाड्याने घेणे, पेट्रोल, कर्मचारी आणि इतर लागू करांसह सर्व शुल्कांचा दर समाविष्ट असावा.

दरम्यान, किनारी भागातील सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मच्छिमार बोट भरकटली होती. त्यामुळे मच्छिमारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सरकारने मच्छिमार खात्याने पावले उचलली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT