Goa Surf Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Surf Festival 2023: समुद्राच्या लाटांवरील थरारासाठी व्हा सज्ज; गोव्यात होणार पहिला 'सर्फ फेस्टिव्हल'

Akshay Nirmale

Goa Surf Festival 2023: गोव्यात पहिला सर्फ फेस्टिव्हल आयोजित केला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस याची सुरवात होणार आहे. यात सर्फिंग कार्यशाळा, स्पर्धा, फ्ली मार्केट, फूड स्टॉल, पार्टी असे कार्यक्रम असणार आहेत.

उत्तर गोव्यातील मोरजी किनाऱ्यावर या गोवा सर्फ फेस्टिव्हल २०२३ चे आयोजन केले जाणार आहे. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर (शुक्रवार ते रविवार) या तीन दिवसांच्या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. सर्फिंगला एक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्यासह समुद्र संवर्धनाचे महत्व पटवून देणे हा या फेस्टिव्हल आयोजनाचा हेतू आहे.

या पहिल्याच गोवा सर्फ फेस्टिव्हलमध्ये सर्फ कसे करायचे, स्केटिंग आणि स्किम बोर्ड कसे करायचे, संतुलन कसे साधायचे हे तर शिकवले जाणार आहे पण महासागर आणि सागरी जीवांचा आदर राखण्याबाबत, जैवसंवर्धनाबाबत जागर केला जाणार आहे.

या महोत्सवाचे संचालक आणि ऑक्टोपस सर्फ स्कूलचे मालक एडी रॉड्रिग्ज म्हणतात, “गोव्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. येथे सर्फिंगसाठी चांगले किनारे आहेत. लाटा आहेत. आमच्याकडे सुविधा आहेत, अनुभव आहे, सर्वोत्तम जीवरक्षक सुविधा आहेत.

हा महोत्सव गोवा सर्फिंग असोसिएशनच्या सहकार्याने होत आहे. सर्फिंगला एक खेळ म्हणून ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव होणार आहे. 3 दिवसात विविध स्पर्धा होतील. यात 100 भारतीय खेळाडू सहभागी होतील. त्यांना रोख बक्षिसे दिली जातील.

असा असेल महोत्सव

येथे एक फ्ली बाजार, काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, क्रीडा कार्यशाळा असतील. बहुतेक कार्यशाळा विनामूल्य आहेत. या कार्यशाळा त्या स्केटबोर्डिंगमधील सर्फिंगशी संबंधित आहेत, स्लॅकलाइनिंग, स्किमबोर्डिंग आणि बॅलन्स बोर्डिंग हे सर्व बॅलन्स स्पोर्ट्स आहेत. यात सर्फरला संतुलन आणि मूळ शक्ती सुधारण्यासाठी असतात.

पर्यावरणपूरक महोत्सव

आयोजकांनी सांगितले की, या उत्सवात कर्णकर्कश संगीत, प्रकाशझोत नसतील. हा पर्यावरणपूरक फेस्टिव्हल अलेल. ड्रम सर्कल, ओपन माईक सह नियंत्रित ध्वनी असेल. नंतरच्या पार्ट्या समुद्रकिनाऱ्यापासून दूर ठेवण्यात येईल. किनाऱ्यांची स्वच्छताही राखली जाईल.

हा संगीत महोत्सव नाही. आम्हाला गोवा पार्टी करण्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचा वाटतो. हा महोत्सव पर्यायी समुद्री खेळ आणि सागरी जागरुकता आणि किनारपट्टी संवर्धन याविषयी आहे.

हे उपक्रम होणार...

या काळात टाइड पूल वॉक, ओशन अवेअरनेस वर्कशॉप (किड्स), बॅलन्स बोर्ड अ‍ॅक्टिव्हिटी, अल्टिमेट फ्रिसबी असे उपक्रम होणार आहेत.

टाइड पूल वॉकमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञ शिक्षक आणि संशोधकांच्या सहाय्याने गोव्याच्या समुद्रातील जैवविधिता पाहता येईल. त्यांच्या संवर्धनाविषयी जाणून घेता येईल.

ओशन अवेअरनेस वर्कशॉप (किड्स) मध्ये यात मुलांना सागरी जीवांबद्दल सांगितले जाईल, तसेच मुलांनी केलेली पोस्टर्स फेस्टिव्हलमध्ये लावली जातील.

बॅलन्स बोर्ड अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये बोर्ड शेपर्सकडून बोर्डवर कसे संतुलित करायचे ते शिकता येईल, बोर्डबाबतची सर्वंकष माहिती जाणून घेता येईल. तर अल्टिमेट फ्रिसबी या सांघिक खेळाबद्दल अधिक जाणून घेता येईल. दुसऱ्या संघाविरूद्ध खेळता येईल. दरम्यान, यासाठी https://www.goasurfing.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT