Goa Fire Dept Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Dept Fuel Scam: अग्निशमन दल इंधन घोटाळा चौकशी अहवाल दोन दिवसांत

Goa Fire Dept Fuel Scam: अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून इंधन घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी सुरू.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fire Dept Fuel Scam

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून इंधन घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्यातील विविध स्थानकामधील वाहनांमध्ये भरलेल्या इंधानाबाबत लॉगबुक मागवण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे.

विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. या चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसांत आपल्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यातील माहितीनुसार योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.

सरकारी इंधन कोटा दलाचे अधिकारी सरकारी वाहनांसाठी वापरण्याऐवजी तो खासगी वाहनांसाठी वापरण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे दलाच्या जवानांत खळबळ माजली होती. हे प्रकार कोणत्या अग्निशमन दलाच्या स्थानकात घडत आहेत, याची चर्चा सुरू झाली होती.

इंधनाचा घोटाळा होत असल्याच्या वृत्ताने संचालकही गडबडून गेले होते. त्यांनी त्वरित या प्रकरणी चौकशीचे निर्देश खात्यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या प्रकरणाची दखल सरकारी पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती मागितली आहे. त्यामुळे हे खाते अडचणीत आले आहे.

अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये इंधन घालण्यासाठी खात्यातर्फे स्लिप्स (इंधन कुपन) असतात. या स्लिप्स पेट्रोल पंपवर दिल्यावर ठराविक इंधन सरकारी वाहनांत भरले जाते.

मात्र काही अधिकारी सरकारी वाहनांत घालायचे इंधन ही स्लिप्स सादर करून खासगी वाहनांत घालतात व बिल मात्र सरकारी वाहनाच्या क्रमांकावर घेतले जाते.

लेखा कार्यालयातून बिले मंजूर केली जातात. यात कोणाकोणाचे हात आहेत, हे या अहवालानंतर समोर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT