Yurli Alemao on Private Land for Goa Film City Dainik Gomantak
गोवा

Goa Film City: फिल्म सिटीसाठी खासगी जमिन कशासाठी? सरकारी भूखंड का वापरत नाही? युरी आलेमाव यांचे सवाल...

एंटरटेनमेंट सोसायटी फिल्म सिटीसाठी शोधतेय 250 एकर जागा

Akshay Nirmale

Goa Film City: गोव्यात फिल्म सिटी उभारण्यासाठी 250 एकर जागेचा शोध द एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ही सरकारी संस्था घेत आहे. त्यासाठी, बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी स्थानिक वर्तमान पत्रात संस्थेने जाहीरातही दिली होती. तथापि, त्यावरून राज्यातील विरोधकांनी आज, गुरूवारी सरकारला विविध सवाल केले आहेत.

(Yurli Alemao on Private Land for Goa Film City)

फिल्म सिटीसाठी खासगी जागेचा शोध का घेतला जात आहे?, सरकारी भूखंडाचा वापर का केला जात नाही? असे सवाल विरोधकांकडून करण्यात आले आहेत.

गोव्यातील काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, अनेक सरकारी भूखंड आधीच उपलब्ध आहेत. ते अशा उद्देशांसाठी वापरले जाऊ शकतात.

आलेमाव यांनी म्हटले आहे की, सरकारी तिजोरी रिकामी असताना ही उधळपट्टी कशासाठी? स्पेशल इकॉनॉमिक झोनमधून अलॉट करण्यात आलेल्या भूखंडाचा वापर फिल्म सिटीसाठी का केला जात नाही? नॉयलॉन-66 साठी दिलेली किंवा बेतूल येथील जमिनीचा वापर त्यासाठी का केला जात नाही? असे सवाल युरी आलेमाव यांनी केले आहेत.

सरकारने दक्षिण गोव्यातील बेतूल येथे आणखी एक भूखंड संपादित केला होता. 2017 मध्ये तेथे एक डिफेन्स एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस आमदार अल्टोन डिकोस्टा यांच्या मतदारसंघात बेतुल आहे.

त्यांनीही, जर बेतुलमध्ये फिल्मसिटी उभारण्याचे आवाहन केले आहे. बेतुल पठारावर फिल्म सिटी उभारण्यासाठी सरकारचे स्वागत आहे, असे ते म्हणाले.

ESG ने बुधवारी वर्तमान पत्रात दिलेल्या जाहीरातीत 250 एकर जागा हवी असून क्लियर टायटल असलेल्या जमिनींच्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आमंत्रण दिले होते.

एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेमुळे IFFI गोवाचे रूपांतर आता इंटरनॅशनल फ्रॉड फेस्टिव्हल ऑफ गोवा मध्ये झाले आहे. आता उधळपट्टी करणाऱ्या या संस्थेने फिल्म सिटीची उभारणी करण्यासाठी २५० एकर खासगी जमिनीसाठी निविदा मागवल्या आहेत.

ईएसजीतर्फे दरवर्षी गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) आयोजित केला जातो. राज्यातील चित्रपटांच्या शूटिंगसाठी सर्व परवानग्यांसाठी ही नोडल एजन्सी आहे.

पूर्वी, राज्य सरकारने दक्षिण गोव्यातील वास्को शहराजवळ विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी जमीन संपादित केली होती आणि पोंडा शहराजवळील केरी गावात दुसरा भूखंड घेतला होता. मात्र, दोन्ही प्रकल्प रखडले. फिल्मसिटीची संकल्पना माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी मांडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT