Banastarim: बाणस्तारी ब्रिज 22 ऑक्टोबर रोजी राहणार बंद; दोन तासांसाठी सर्व वाहनांना बंदी

पुलाच्या डेक लेव्हलची तपासणी होणार
Banastarim Bridge
Banastarim Bridge Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Banastarim Bridge: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 A वरील बाणस्तारी येथील पुल 22 ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या पुलाचे निरीक्षण आणि डेक लेवलची तपासणी केली जाणार आहे, त्यामुळे या दिवशी पूल वाहतुकीसाठी दोन तासांसाठी बंद राहिल.

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पुरावरून वाहतूक बंद राहिल. या काळात या पुलाची तपासणी आणि डेक लेव्हलचे निरीक्षण केले जाणार आहे.

फोंडा येथील राष्ट्रीय महामार्ग डिव्हीजन एक्सव्ही चे कार्यकारी अभियंता शशिकांत देसाई यांच्या कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Banastarim Bridge
Film City in Goa: खुशखबर! गोव्यात उभारणार फिल्मसिटी! एंटरटेन्मेंट सोसायटीतर्फे 250 एकर जागेचा शोध

जानेवारी, मे आणि ऑक्टोबर महिन्याच्या प्रत्येक चौथ्या रविवारी हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी दोन तासांसाठी बंद राहिल, असे नियोजन आधीच करण्यात आले होते.

सकाळी साडे सहा ते सकाळी साडे आठ या काळात या तीन महिन्यांमध्ये दर चौथ्या रविवारी हा पूल वाहतुकीसाठी बंद राहिल. त्यानुसार हा पुल 22 ऑक्टोबर रोजी सकाळी दोन तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक पोलिस, वाहतूक विभाग, कॅप्टन ऑफ पोर्ट खाते आणि इतर खात्यांशी समन्वय साधून काम केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No UPI Day 2 October 2026 Merchant Protest
Porvorim elevated road traffic
Congress Alliance Goa 2027
House Of Abhinandan Mega project Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com