CM Pramod Sawant: यंदाची 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गोव्यात या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.
आज, गुरूवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्विमिंग कॉम्प्लेक्स येथील तयारीची पाहणी केली. या कॉम्लेक्समध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या दृष्टीने त्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने अनेक कामे पूर्ण झाली आहेत, अनेक कामांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. राष्ट्रीय स्पर्धा असल्याने गेल्या काही काळात स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, राज्याचे मुख्य सचिव या स्पर्धेच्या तयारीचा नियमित आढावा घेत आहेत.
बुधवारीच मुख्यमंत्री सावंत यांनी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यासमवेत श्यामाप्रसाद मुखर्जी इनडूअर स्टेडियमची पाहणी केली होती. तेथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
19 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरवात होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उद्घाटनसोहळा रंगणार आहे.
त्या स्टेडियममधील तयारीची तसेच स्टेडियमशेजारी पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यासाठी दोन जागांची पाहणी नुकतीच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.