FTII Training Dainik Gomantak
गोवा

FTII Training: चित्रपट क्षेत्रात करिअरसाठी गोव्यातच प्रशिक्षणाची संधी, मनोरंजन संस्थेचा ‘एफटीआयआय’सोबत करार

Film Career Training Goa: चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या गोव्यातील युवकांसाठी राज्यातच व्यावसायिक प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या गोव्यातील युवकांसाठी राज्यातच व्यावसायिक प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्‍यासाठी गोवा मनोरंजन संस्था आणि पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) यांच्यात महत्त्‍वपूर्ण भागीदारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या सहकार्यामुळे चित्रपट निर्मिती, दूरदर्शन आणि मनोरंजन क्षेत्रातील तांत्रिक व सर्जनशील कौशल्यांचे प्रशिक्षण गोव्यातील युवकांना मिळणार आहे.

या भागीदारीअंतर्गत राज्यात अल्पकालीन अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, मास्टरक्लास आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातील. चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन मिळणार असून, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferry Boat: गोव्यात निवडणुकीपूर्वी 2 नव्या रो-रो फेरीबोटी सेवेत; वॉटर मेट्रोचे काय?

Junta House Case: 'जुन्ता हाऊस' प्रकरणात सरकारला हायकोर्टाचा झटका; अवर सचिवांना दंड भरण्याचे आदेश

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडे कर्मचाऱ्यांच्या 73 मोठ्या मागण्या! 6% वार्षिक पगारवाढ, 50% DA मर्जर अन् 5 प्रमोशन; सरकार देणार मंजुरी?

Goa Politics: काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीची युती पक्की! 8 दिवसांत अधिकृत घोषणा; जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात, चोडणकरांची माहिती

Noise Pollution: ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष भोवणार! पोलिस अधीक्षकांना कोर्टाचा सज्जड इशारा

SCROLL FOR NEXT