Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: सत्तरीतील चित्रशाळा जागू लागल्या ! भाविकांकडून मूर्तींची निवड, बुकिंग सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

gbg92Ganesh Chaturthi 2023 गणेश चतुर्थी पुढच्या महिन्यात आहे, आता बहुतांश चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती बनवून तयार झालेल्या आहेत. काही मूर्तींची कामे टप्याटप्याने पूर्णत्वाकडे जात आहेत.

सत्तरी ही कलाकारांची भूमी आहे. गणपतीची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे वाळपई येथील प्रसिध्द मूर्तिकार उदय वेलिंगकर म्हणतात.

सत्तरी तसेच गावागावत अनेक गणेश चित्रशाळा रात्रीच्या जागू लागल्या आहे. यंदा पावसाळा उशीरा सुरु झाला तसेच चतुर्थी सप्टेंबरमध्ये असली तरी गणेश मूर्ती तयार झालेल्या आहेत.

सुबक मूर्ती व ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्ती चित्रशाळेत तयार होऊ लागलेल्या आहेत. तर काहीजण तयार असलेल्या मूर्तींची निवड करुन आपल्या नावांनी बुकिंग करत आहेत. आकारानुसार व सजावटीनुसार मूर्तींची किंमत काहींशी वाढली आहे.

वाळपई शहरात वेलिंगकर यांची एक मात्र चित्रशाळा आहे आणि या चित्रशाळेत बहुतांश मूर्ती तयार झालेल्या आहेत. चतुर्थीला उशीर असल्याने रंगकाम केलेल्या मूर्ती पॅक करुन ठेवल्या जातात.

आता जवळपास ७०० च्यावर गणेशमूर्तींची मागणी आहे. आणि दरवर्षी हा आकडा वाढत असतो. वेलिंगकर यांच्या चित्रशाळेत त्यांचे मुले, पत्नी, भाऊ, भावजया, पुतणे मदत करतात.

पोर्तुगीज काळापासूनची चित्रशाळा

वाळपई येथे पोर्तुगीज काळापासून अर्थात शंभर वर्षांपूर्वीपासून चालत आलेली वेलिंगकर यांची गणेश मूर्तीची चित्रशाळा प्रसिद्ध आहे. उदय वेलिंगकर यांच्या वडील सदाशिव यांनी सुरू केलेली परंपरा वेलिंगकर बंधू जोपासत आहेत.

त्यावेळी पोर्तुगीजांच्या जुलमामुळे काही काळ त्यांच्या वडिलांना चित्रशाळा बंद करून बांदा येथे जावे लागले. पुन्हा ही चित्रशाळा सुरू करावी, ही त्यांची इच्छा होती.

त्यामुळे त्यांच्या मुलांनी लहान असताना चित्रशाळा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना अनंत खाडीलकर मास्तर यांनी मोलाची मदत केली व बंद पडलेली चित्रशाळा पुन्हा सुरु केली.

आज बाजारात ‘पीओपी’ मूर्ती विक्रीसाठी येतात.आता कित्येक ठिकाणी आणलेल्या तयार मूर्ती दुकानात ठेवल्या जातात. पण पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना याची झळ बसते. मात्र, जी मजा हाताने मूर्ती घडवण्यात असते. ही इतर कशातही नसते. सध्या कित्येक ठिकाणच्या चित्रशाळा एकेक करून बंद पडत आहेत, हे मोठे संकट आहे.

-उदय वेलिंगकर, मूर्तिकार

आपल्याला लहानपणापासून ही मूर्ती बनवण्याचा छंद आहे. मात्र घरी परिस्थिती व त्यावेळी कोणीही प्रोत्साहन व मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे आपली आपल्या स्वतःची चित्रशाळा उघडू शकलो नाही. पण याची मला कोणतेही खंत नाही. कारण आपली आवड, वेलिंगकर यांच्या चित्रशाळेत येऊन पूर्ण केली. त्यामुळे एक प्रकारे समाधान मिळते. आहे.

-उदय मांद्रेकर,मूर्तिकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT