Banastarim Bridge Accident Case: मर्सिडीज चालक परेश सावर्डेकरचा पोलिस रिमांड आणखी पाच दिवसांनी वाढवला

या प्रकरणात नागरिक आक्रमक झाले असून, प्रत्यक्षदर्शीने जबानी दिल्यानंतर महिलाच वाहन चालवीत असल्याचे स्पष्ट होत आहे
Banastarim Bridge Accident Mercedes Driver
Banastarim Bridge Accident Mercedes Driver Dainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident Case: बाणस्तारी अपघात प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला मर्सडीजचा चालक परेश सिनाय सावर्डेकरचा पोलिस रिमांड आणखी पाच दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.

Banastarim Bridge Accident Mercedes Driver
Banastarim Bridge Accident: मर्सिडीजमधील 'त्या' महिलेला पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न: प्रतिमा कुतिन्हो

बाणस्तारी येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्‍थेत कार चालवत अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालक परेश सिनॉय सावर्डेकर (48) याला पोलिसांनी अटक केली.

अपघातावेळी कार नक्की कोण चालवत होते हा तिढा कायम आहे. मात्र, एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांनी दाखल FIR ला आव्हान दिले असून, अपघातावेळी महिलाच कार चालवत होती असे म्हटले आहे.

महिलाच वाहन चालवत होती...

दरम्यान, या प्रकरणात नागरिक आक्रमक झाले असून, प्रत्यक्षदर्शीने जबानी दिल्यानंतर महिलाच वाहन चालवीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या दिवशी हा अपघात घडला, त्यावेळी गाडी कोण चालवत होते, असा संशय असताना पोलिसांनी महिलेचीही वैद्यकीय तपासणी करायला हवी होती. ती का केली नाही, असा सवाल दिवाडी येथील नागरिकांनी आज उपस्थित केला.

हाच प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करीत त्यांनी पोलिसांना घेरले. रात्री उशिरापर्यंत लोकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकासमोर ठिय्या मांडला होता. परेश सावर्डेकर यांच्या पत्नीस वाचविण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का, असा सवालही संतप्त नागरिकांनी आहे. बुधवारी महिलेस अटक केली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com