FDA Raid X
गोवा

Goa FDA Action: अन्नभेसळ कराल तर ‘एफडीए’शी गाठ! 9 महिन्यांत शेकडोंना दंड; 22 हजार किलोहून अधिक निकृष्ट पदार्थ जप्त

Goa FDA Raid: ‘एफडीए’चे अधिकारी म्हणाले, या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई नसून जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राज्यभर अन्न भेसळ व अस्वच्छतेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम राबवत कडक कारवाई केली आहे.

ऑगस्ट २०२४ ते मे २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २१,६६७ किलोहून अधिक भेसळयुक्त व खराब अन्नसामग्री नष्ट करण्यात आली असून, १.६५ लाखांहून अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये नावेली, कोलवा, बार्देश, सांगे, फोंडा, कळंगुट, मडगाव, मुरगाव, डिचोली, म्हापसा, करासवाडा, गोवा वेल्हा, पर्रा, पिळर्ण, शिवोली आणि इतर भागांचा समावेश होता.

तपासणी मोहिमेदरम्यान एफडीएच्या तपासणी पथकांनी अनेक आस्थापनांना तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. परिस्थिती सुधारल्याशिवाय व अधिकृत परवाने मिळेपर्यंत व्यवसाय पुन्हा सुरू करू नये, अशी स्पष्ट सूचनादेखील देण्यात आली.

‘एफडीए’चे अधिकारी म्हणाले, या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई नसून जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आहे. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा कायम राखणे हे आमचे कर्तव्य आहे.

नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.

‘एफडीए’ने येणाऱ्या पर्यटन हंगाम व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अव्याहत पुनर्तपासणी आणि कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा देत अन्न सुरक्षा हा गोमंतकीयांचा अविभाज्य हक्क असल्याचा पुनरूच्चार केला आहे. ग्राहक हक्काबाबत जागृती झाली आहे.

ग्राहकांनी सावध राहावे!

‘एफडीए’च्या संचालक डॉ. श्वेता देसाई म्हणाल्या, जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे यंदाचे संकल्पवाक्य ‘फूड सेफ्टी - सायन्स इन ॲक्शन’ आहे. अन्न योग्यरीतीने न साठवल्यास तेच आरोग्याला घातक ठरते, ही जागृती जनतेमध्ये करणे हा आमचा उद्देश आहे. ग्राहकांनी सावध राहून अशा प्रकरणांची तक्रार करावी.

प्रमुख कारवाई

परवाने स्थगित : काही आस्थापनांची ‘एफएसएसएआय’ नोंदणी निलंबित.

११ हून अधिक युनिट्‌स बंद : कळंगुट, म्हापसा, थिवी, पर्रा, पिळर्ण आदी.

स्टॉल्स सील : बागा, कांदोळी किनारी भागातील तात्पुरते स्टॉल्स.

इम्प्रूव्हमेंट नोटिसेस : फोंडा, मुरगाव आदी ठिकाणी स्वच्छता न राखल्याबद्दल.

काही ठळक उल्लंघने

कळंगुट : हैदराबाद दम बिर्याणी येथे वॉशरूममध्ये चिकन धुतले जात असल्याचे व मुदत संपलेले ‘चॉकलेट अनारसे’ विक्रीस आढळले.

मुरगाव : स्वयंपाकघरात जाळ्या, भिंतींवरचा रंग उखडलेला; कच्चे-शिजवलेले मटण एकाच डीप-फ्रीझरमध्ये.

कोलवा : २०२० पासून मुदत संपलेले पदार्थ साठवणाऱ्या बेकरीवर कारवाई.

नावेली-केपे-सांगे : नकली ‘एफएसएसएआय’ परवाने, लेबल-भेसळ व बेकायदेशीर साठवण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT