Mapusa Food Safety:म्हापशात हैदराबादी बिर्याणी, मोमोजच्या दुकानांना 'टाळे'; FDA च्या कारवाईत 12 पैकी 3 दुकाने बंद

Food Safety Action Goa: हणजूण आणि म्हापसा परिसरात एफडीए पथकाने कडक नजर ठेवली असून, नुकत्याच केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या
Goa FDA raid
Goa FDA raidDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील खाद्यपदार्थांच्या व्यवसायांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोहीम तीव्र करण्यात आली आहे. हणजूण आणि म्हापसा परिसरात एफडीए पथकाने कडक नजर ठेवली असून, नुकत्याच केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अस्वच्छतेचा ठपका, दुकाने सील!

बुधवार (दि.४) रोजी एफडीए पथकाने एकूण १२ खाद्य व्यवसायांची तपासणी केली. यामध्ये आसगांव जंक्शन येथील 'इंडियन मोमोज' नावाचे एक फास्ट फूड दुकान आणि एका 'हैदराबादी दम बिर्याणी'च्या दुकानाला तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या दुकानांमध्ये अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात आढळले.

यासोबतच, जनता आईस फॅक्टरी नावाचा एक आईस कारखाना एफडीएचा परवाना नसतानाही कार्यरत असल्याचे आढळले. या कारखान्यालाही कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Goa FDA raid
FDA Raid: पिळर्ण, पर्रा येथे एफडीएचा छापा; दोन मटण शॉप, IDC येथील कँटीन सील, काजू युनिटवरही कारवाई

उर्वरित सर्व ११ दुकानांना 'इम्प्रूव्हमेंट नोटीस' बजावण्यात आली आहे, म्हणजे त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

अस्वच्छता आढळल्यास दंड!

म्हापसा येथील अलंकार मार्केटमध्ये स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी विशेष पाहणी करण्यात आली. बहुतेक व्यवसायांनी नियमांचे पालन करण्याचे प्रयत्न केले असले तरी, मेसर्स झाईका आणि मेसर्स बॉबी फास्ट फूड या दोन ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे, अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ६९ नुसार, त्यांना अनुक्रमे १०,००० रुपये आणि ८,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई उत्तर गोव्याचे पदनामित अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी केली.

एफडीए पथकामध्ये रिचर्ड नोरोन्हा यांच्यासोबत राजाराम पाटील, अमित मांद्रेकर, नौसिन मुल्ला आणि स्नेहा गावडे यांचा समावेश होता. या सर्व कारवाईचे मार्गदर्शन एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com