Vijai Sardesai inaugurates Mahatma Gandhi Football Ground at Madel Goa Dainik Gomantak
गोवा

Football Ground Inauguration: माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन, आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती

Madel Football Ground Inauguration Goa: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन करण्यात आले.

हा सोहळा वेलांकिणी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी फा. वेन्तुरा लॉरेन्स, क्लबचे अध्यक्ष जेसन फर्नांडिस, सचिव हेस्टन डिकॉस्ता, इतर पदाधिकारी तसेच नगरसेवक फ्रान्सिस जोन्स उपस्थित होते.

इंग्रजांच्या काळातही भारतात फुटबॉल खेळला जात असे. एकदा मोहन बागान संघाने ब्रिटिश संघावर मात केली. तेव्हापासून भारतात फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहन मिळाले, असे सरदेसाई यांनी सांगितले. हा मडगावातील सर्वोत्तम व विकसनशील प्रभागांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरदेसाई पुढे म्हणाले की, गोव्यात सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. लोकांमध्ये दुफळी माजवण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. या प्रभागात आरोग्यविषयक साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे मनोरंजनाच्या सुविधा व इतर विकासकामेही उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT