Kisan Samruddhi Kendra  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वर्षभरात 2 लाख किसान समृध्दी केंद्र

मंत्री भगवंत खुबा: भाजप सरकार कृषी विकासासाठी कार्यरत

गोमन्तक डिजिटल टीम

Kisan Samruddhi Kendra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आज देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, कृषी विकासासाठी कार्य करीत आहे.

कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविताना शेतकऱ्यांची कमाई वाढवून त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देशभरात गेल्या वर्षभरात सव्वा लाख प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहेत.

तर येत्या वर्षभरात आणखीन २ लाख केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी कारापूर तिस्क येथे भेटीत दिली.

कारापूर-तिस्क येथील जय किसान जंक्शन, झुवारी फार्म हब लि., पारादिप फोस्फेट लि. च्या पंतप्रधान सिएमओ नीलेश देसाई, झुवारी फार्मा हब लि.चे उपव्यवस्थापक मंदार सावईकर, स्टोअर व्यवस्थापक सागर सावंत व इतरांची उपस्थिती होती.

या समृध्दी केंद्राचा शेतकरी योग्य लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना या केंद्राचा फायदा मिळत असून त्याद्वारे शेतकरी आपली शेते फुलवू लागले आहेत. हे ऐकून समाधान वाटले, असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी म्हटले.

या किसान समृद्धी केंद्राचे उपव्यवस्थापक मंदार सावईकर यांनी मंत्र्यांना संपूर्ण केंद्राची माहिती दिली. या केंद्राचा या भागातील शेतकरी चांगला लाभ मिळवत आहे, असे मंदार सावईकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांना बियाण्यांपासून खत, किटकनाशक, उपकरणे व इतर सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे हे केंद्र आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र व गोवा सरकारच्या कृषी योजनांचा लाभ किती प्रमाणात लोकांना मिळत आहे, याची मंत्री भगवंत खुबा यांनी घेतली व केंद्राचा कारभार व्यवस्थित चालण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य एन्काऊंटरमध्ये ठार

IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

दोना पावला दरोडा प्रकरणात 7 महिन्यानंतर अटक, उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार ताब्यात; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

'धार्मिक संघटनेकडून त्रास, आर्थिक संकट, बायका पोरांचा सांभाळ करणं शक्य होत नाही'; व्हिडिओ रेकॉर्ड करुन सिंधुदुर्गात मुस्लिम युवकाने संपवले जीवन

Rishabh Pant: ...पठ्ठ्यानं स्टाईल नाही बदलली, ऋषभ पंतचा गोलंदाजासोबतचा खुमासदार संवाद व्हायरल; सामन्यातील व्हिडिओने वेधले लक्ष Watch Video

SCROLL FOR NEXT